Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकने घेतला पेट , चालकाचा होरपळून मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला  लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ एका ट्रकला पहाटेच्या सुमारास अचानक  भीषण आग लागल्याने  या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ  पहाटेच्या सुमारास हि दुर्घटना घडली. सुनील हनवते (वय ३०) रा. तळेगाव दाभाडे असे या ट्रकचालकाचे  नाव आहे.

Advertisements

दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गावर वाहनांना लागलेल्या आगीच्या दोन  घटना घडल्या असून एका चालकाचा होरपळून मृत्यू तर दुसरा चालक गंभीर जखमी झाले आहे.

Advertisements
Advertisements

मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे भांडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला माडप गावाजवळ शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की, काही क्षणात आगीने रौद्ररूपधारण केलं आणि संपूर्ण ट्रक कचाट्यात सापडला. यात मोठ्या प्रमाणात ट्रकचे नुकसान झाले आहे. देवदूत यंत्रणेच्या दोन तसंच खोपोली नगरपरिषदेच्या एक अशा तीन अग्निशमन वाहनाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ट्रकला लागलेली आग पूर्णपणे विझवली. या संपूर्ण घटनेत जवळपास दोन  तास मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!