Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : लाच मागणारा जमादार एसीबीच्या जाळ्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : तक्रारदाराला नवीन हायवा ट्रकमधुन वाळू वाहतूक करण्यासाठी ३० हजाराची लाच मागणा-या पाचोड पोलिस ठाण्याच्या जमादारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने सोमवारी (दि.५) गजाआड केले. रामदास श्रीहरी राख असे लाचखोर जमादाराचे नाव असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी काही दिवसापुर्वीच नवीन हायवा ट्रक खरेदी केला होता. सदरील ट्रक मधुन वाळू वाहतूक करायची असेल तर मला ३० हजार रूपयांची लाच द्या अशी मागणी पाचोड पोलिस ठाण्याचे जमादार रामदास राख यांनी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शाहनिशा केल्यावर अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या कर्मचाNयांनी सोमवारी पाचोड येथे सापळा रचून रामदास राख यांना ३० हजाराची लाच मागीतल्याप्रकरणी अटक केली.
याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!