Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशभर सरकार विरोधात आंबेडकरी समाज संतप्त तर भाजपकडून बचावासाठी उगळला जात आहे कॉँग्रेसचा इतिहास !!

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरू गेल्या काही दिवसांपासून देशभर संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावरून आंबेडकरी समाजासह काँग्रेससह , आम आदमी पार्टी, बसपा आणि सपा यांच्यासह अनेक राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. अमित शहा यांनी या प्रकरणावरून राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे यावरून कॉँग्रेसने देशभराआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तर दुसरीकडे भाजपने बचावात्मक पवित्रा घेत काँग्रेसने बाबासाहेबांचा अवमान केला असल्याचा प्रचार सुरू केला आहे.

यासंदर्भात, प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना, आम्ही काँग्रेसचा बुरखा फाडणार आणि खरा चेहरा जनतेसमोर आणणार, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसनेच केला होता. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा निवडणुकीत पराभव करवला होता आणि त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मैदानातही उतरले होते.

रविशंकर पुढे म्हणाले, “1952 च्या निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंखात आंबेडकरांचा पराभव झाला होता आणि त्यांच्या विरोधात असलेले नारायण सदोबा काजरोळकर यांचा विजय झाला होता. त्या निवडणुकीत नेहरूंनी जबरदस्त प्रचार केला होता आणि आंबेडकरांविरोधातही प्रचार करण्यासाठी गेले होते. एवढेच नाही तर, याच नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेस सरकारने 1970 मध्ये देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कारही दिला होता.”

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेतृत्व करणारे संपूर्ण नेहरू-गांधी कुटुंब आपल्यासाठी भारत रत्न घेत राहिला. मात्र, त्याला भीमराव आंबेडकरांना सन्मानित करण्यात आले नाही. उलट त्यांनी निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या नारायण सदोबा काजरोळकर यांना पद्म भूषण दिले. आंबेडकरांचा याहून मोठा कोणताही अपमान असू शकत नाही.”

“आमच्यकडे सर्व कागदपत्रे आहेत आणि काँग्रेसने कशा प्रकारे सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला, हे आम्ही संपूर्ण देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवणार. अमित शाह यांचा बचाव करत रविशंकर प्रसाद म्हणाले, “त्यांच्या भाषणाचा एक भाग कट करून पसरवला जात आहे. खोटा प्रचार केला जात आहे. आम्ही काँग्रेसला याचे उत्तर देणार आणि संपूर्ण देशभरात मोहीम चालवून त्यांचा आंबेडकरविरोधी विचार जनतेसमोर उघडा पाडणार .” असेही रवीशंकर यांनी म्हटले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!