Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना 18 टक्के जीएसटी !! प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला संताप….

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी सोमवारी परीक्षा फॉर्मवर जीएसटी लावल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्ला चढवला. ते म्हणाले की, ज्या पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेसाठी तयार करण्यासाठी प्रत्येक पैसा वाचवला, त्यांच्या स्वप्नांचे सरकारने उत्पन्नाच्या स्त्रोतात रूपांतर केले आहे. मोदी सरकारने शासकीय नोकरीसाठी अर्ज केल्यावर १८% जीएसटी आकारला जात असल्याची माहिती कॉँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर वरुन दिली असून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी कल्याण सिंग सुपर स्पेशालिटी कॅन्सर इन्स्टिट्यूट, सुलतानपूरचा एक परीक्षा फॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करून म्हटले आहे की , “भाजपा तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण परीक्षा फॉर्मवर १८% GST आकारून देशातील तरुणांच्या जखमेवर नक्कीच मीठ चोळत आहे. अग्निवीरसह प्रत्येक सरकारी नोकरीच्या फॉर्मवर जीएसटी वसूल केला जात आहे. फॉर्म भरल्यानंतर सरकारच्या अपयशामुळे पेपर फुटतो आणि भ्रष्टाचार झाला तर तरुणांचा हा पैसा बुडतो.”

Advertisements
Advertisements

https://x.com/priyankagandhi/status/1871111318628921404?

प्रियंका गांधी यांनी पुढे म्हटले आहे की , “पालक खूप काबाडकष्ट करतात, मेहनतीने पैसे जमा करून आपल्या मुलांना शिकवतात. मुलं परीक्षेची तयारी करतात, पण भाजपा सरकारने त्यांच्या स्वप्नांनाही आपल्या उत्पन्नाचं साधन बनवलं आहे. पालक आपल्या मुलांना शिकविण्यासाठी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी आपले जीवन बलिदान देतात आणि प्रत्येक पैसा वाचवतात, परंतु भाजप सरकारने त्यांचे स्वप्न कमाईचे साधन बनवले आहे. ”  प्रियंका यांच्या या पोस्टला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषत: तरुण वर्ग या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया देत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!