Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही : संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : संविधानाची अनेकदा माेडताेड करणाèया आणि घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाèया काँग्रेसला जनता यावेळी मा\ करणार नाही, असे सांगत आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा मिडिया सेंटर मध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत श्री.रीजीजू बाेलत हाेते.यावेळी भाजपा केंद्रीय माध्यम समन्वयक के.के.उपाध्याय ,राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला,डाॅ.सय्यद ज\र इस्लाम,भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चाैहान आदी उपस्थित हाेते. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र आणि आर्थिक राजधानी मुंबईचे याेगदान महत्वाचे आहे.महायुती सरकारच्या काळात अधिक वेगाने विकासकामे हाेत असून,या कामाची पाेचपावती मतदार देतील हा विश्वास ही व्यक्त केला.

मागास वर्गातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी आतापर्यंत माेठी जबाबदारी साेपवल्याने मी जबाबदारीने सांगू शकताे की जी व्यक्ती संविधानाचा सन्मान करत नाही त्याच्या हातात संविधानाची प्रत आणि त्याच्या ताेंडून संविधान शब्द निघणे हे निषेधार्ह आहे. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत काेरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल गांधी यांनी नागपुरात नाचवली. त्यांच्या या कृत्याने डाॅ. आंबडेकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील, असे श्री. रिजिजू यावेळी म्हणाले.

Advertisements

2015 पर्यंत काँग्रेसने संविधान दिन का साजरा केला नाही….

रिजिजू यांनी सांगितले की, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे नाव यादीतून वगळले हाेते. महात्मा गांधी आणि इतर काहींनी हे पहिले सरकार निवडणुकीद्वारे हाेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा कुठे त्यांना देशाचे पहिले कायदा मंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून नेहरू यांनी डाॅ.आंबेडकर यांचा कायम अपमान केला. अखेरीस डाॅ. आंबेडकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे जिथे जाऊन निवडणुका लढवल्या तिथे तिथे काँग्रेसने प्रयत्नपूर्वक त्यांचा पराभव केला. 2015 पर्यंत काँग्रेसने संविधान दिन का साजरा केला नाही, असा सवालही रिजिजू यांनी उपस्थित केला.

Advertisements
Advertisements

आणीबाणी लादून तर काँग्रेसने लाेकशाहीचा गळा घाेटला हाेता.काँग्रेसने आधी संविधानावर त्यांनी वारंवार केलेल्या हल्ल्यांबाबत उत्तर द्यावे. तेव्हाच हातात संविधान धरावे आणि डाॅ.आंबेडकर यांचे नाव घ्यावे. संविधान आणि डाॅ. आंबेडकर यांचे नाव घेण्याचा काँग्रेसला काहीही अधिकार नाही. नेहरू यांनीच सर्वप्रथम आरक्षणाला विराेध केला, याची नाेंद संसदेच्या रेकाॅर्डमध्ये आहे. काँग्रेसने डाॅ. आंबेडकरांना भारतरत्न नाकारले हाेते मात्र जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आले हाेते हेही लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

मुस्लिम कायम गरीबच राहिले आणि फायदा मात्र काँग्रेसचा झाला….

मुस्लिमांचा कायमच वाेट बँक म्हणून वापर करत काँग्रेसने त्यांचे सर्वात माेठे नुकसानच केले. त्यामुळे मुस्लिम कायम गरीबच राहिले आणि फायदा मात्र काँग्रेसचा झाला. त्या पार्श्वभूमीवर भाजपा समाजातील सर्व घटकांना साेबत घेऊन चालत आहे आणि त्यांचा विकास साधत आहे. काँग्रेसचा हा खाेटारडेपणा आता उघड झाला असून अल्पसंख्यांकांची मते महायुतीच्याच पारड्यात पडतील,असा ठाम विश्वासश्री.रिजिजू यांनी व्यक्त केला.लाेकसभा निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसने दिशाभूल करणारी माहिती, फेक नरेटिव्ह पसरवले हाेते मात्र आता काँग्रेसचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. खरे काय आणि खाेटे काय हे महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेने आता ओळखले असल्याचे रिजिजू म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकात बाेलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दांचा रिजिजू यांनी तीव्र निषेध केला.माेदी यांचे व्यक्तित्व पाहून पुर्ण विश्वात त्यांच्यापासून प्रेरणा घेतली जात आहे. त्यांनी केलेला देशाचा विकास पाहता भारतीयांना त्यांचा गर्व वाटला पाहिजे, असे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!