’राज ठाकरे तर कधी काय बोलतील याचा नेम नाही ..’, पक्ष चोरल्याचा टीकेला अजित पवारांनी दिले चोख उत्तर ! !
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबराेबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक सभांमधून निशाणा साधल्यानंतर आता अजित पवारांनी राज ठाकरेंना खास त्यांच्या शैलीमध्ये निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतरच्या संघर्षावर बाेलताना राज ठाकरेंनी कठाेर शब्दांमध्ये अजित पवारांवर टीका केली. या टीकेवर अजित पवारांनी इंदापूरमधील जाहीर सभेतून प्रतिक्रिया नाेंदवली.
4 नाेव्हेंबर राेजी ठाण्यामध्ये मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी, ’’महाराष्ट्रात फोडााेडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या 5 वर्षात कळस गाठला. गेल्या 5 वर्षात पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्राॅपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्राॅपर्टी बाळासाहेबांची प्राॅपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गाेष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्राॅपर्टी आहे ती अजित पवारांची नाही,’’ असं म्हणत टीका केली हाेती.
याच टीकेवरुन अजित पवारांनी आधी खाेचकपणे टीका केली. ’’काहीकाही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्यं चालवली आहेत. काही जण म्हणतात यांनी हे चाेरलं, त्यांनी ते चाेरलं. इथं चाेराचाेरी झालेली नाही. लाेकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जाताे. बहुमत ज्या बाजूला असेल त्या बाजूला निर्णय लागला जाताे. निवडणूक आयाेगाकडे त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतले आहेत. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमच्या विराेधकांकडून सुरु आहे,’’ असं अजित पवार जाहीर सभेत म्हणाले.
बुधवारी इंदापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत निशाणा साधला. ’’काेणी काेणाचं काही चाेरलं नाही. त्यामध्ये आमदार, संघटना, संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यावर संघटना चालते. संघटना काेणा एकाच्या मालकीची नसते. काल मी काेल्हापूरला हाेताे तेव्हा उद्धव ठाकरे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे एकनाथ शिंदेंवर आराेप करत हाेते. राज ठाकरे तर कधी काय बाेलतील सांगता येत नाही. मध्येच म्हणतील अजित पवार जातीवाद करत नाही. मध्येच आमच्याबद्दल काहीतरी बाेलून जातील. त्या गाेष्टीला तुम्ही फार महत्त्व देऊ नका. आपले राज्य पुढे नेण्याची धमक काेणामध्ये? प्रशासनावर नियंत्रण काेणकडे आहे? लाथ मारेल तिथे पाणी काढेल याची हिंमत काेणामध्ये? काेण माेठ्या प्रमाणात निधी आणू शकते, काेण चांगल्या चांगल्या याेजना देऊ शकतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे,’’ असे अजित पवार म्हणाले.