Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : होताहेत धक्कादायक खुलासे , अटकेतील डॉक्टरनेही दिला इशारा ….

Spread the love

पुणे : पुण्यातील मद्य प्राशन करून भरधाव पोर्शे कार चालवून दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डॉक्टरला अटक केल्यांनतर या डॉक्टरला मुलाच्या वडिलाचा व्हाट्स अँप कॉल आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

दरम्यान पोर्शे च्या टीमने कारची तपासणी करून आपला अहवाल आरटीओ दिला आहे. कारमध्ये तांत्रिक दोष असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केल्यामुळे आपल्या कंपनीची बाददनामी होऊ नये म्हणून याची तत्काळ दाखल घेऊन पोर्शे कारच्या तज्ज्ञांची टीम पुण्यात आली होती.

विशेष म्हणजे पोलिसांच्या तपासात अपघातानंतर आरोपीला मेडीकल चेकपसाठी रुग्णालयात नेले असताना त्याचे ब्लड सॅम्पल देखील बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या पैकी एका डॉक्टरने या प्रकरणाशी संबंधित सर्वांचीच नावे उघड करण्याचा इशारा दीदीला आहे तर रक्त तापासणीत फेरफार करण्याबाबत आरोपीच्या वडिलांचा फोन आला होता ही माहिती पोलिसांना सीडीआरवरून मिळाली आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणात आता एका लोकप्रतिनिधीचं नाव समोर येत आहे. अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने मदत केली का? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे हे दोघेही आयफोन वापरतात त्यांना कॉल सीडीआरमध्ये सापडू शकतील याची कल्पना होती, त्यामुळे या दोघांनी व्हाट्सअप कॉलवर संपर्क केल्याचीही माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र मेडीकल काउंसीलकडून डॅा. श्रीहरी हाळनोर आणि डॅा. अजय तावरे यांना नोटीस पाठवण्यात आलीय. पुणे पोलीसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर MMCने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही डॉक्टर दोषी आढळल्यास महाराष्ट्र मेडीकल काउंसील डॅा. श्रीहरी होळनोर आणि डॅा. अजय तावरे यांच्यावर कारवाई करणार आहे. दोन्ही डॉक्टरांचे व्यावसायिक परवाने 1 दिवस ते कायमस्वरूपी निलंबित केले जाऊ शकतात अशी माहिती MMCचे प्रशासक डॅा. विक्की रुघवाणी यांनी दिली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!