Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनसेचा लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा , विधानसभेच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन

Spread the love

मुंबई : लोकसभेला मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असून मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. आज मनसेच्या पडावा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण थेट अमित शाह यांच्याशी चर्चा केली. आणि देशाच्या खंबीर नेतृत्वासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की , नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावेत हे मी पहिल्यांदा म्हटले होते याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

दरम्यान मी त्यांच्यावर टीका केली असेल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांच्या भूमिकांना विरोध केला असेल पण त्यांना माझा व्यक्तिगत विरोध कधीच नव्हता, असे सांगायला ते विसरले नाहीत. त्याचवेळी मनसैनिकांनी थेट विधानसभेच्या तयारीला लागावे, असे आदेश राज यांनी दिले.

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे , संजय राऊत यांच्यावर टीका केली . त्याचवेळी मी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा पक्ष निर्माण केला. पक्ष फोडला नाही असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. दरम्यान माझे चिन्ह हे कमावलेले चिन्ह आहे . आयते मिळालेले नाही त्यामुळे पक्षाच्या चिन्हांबाबत कोणतीही तडजोड नाही असा इशाराही त्यांनी यावेली भाजपला दिला. राज यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यापासून मनसे लोकसभेत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले अशी चर्चा सुरू होती.

या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा करून दीर्घकाळ चाललेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी घेतलेली अमित शाहांची भेट, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष होण्याच्या चर्चा, जागावाटपावरून येणाऱ्या प्रतिक्रिया अशा मुद्द्यांवरून जोरदार फटकेबाजी केली.

“नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी गुजरातचा दौरा केला. तेथील विकासकामे पाहिली. तिकडून आल्यानंतर मी मोदींनी भारताचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. ज्या माणसाकडून आपल्या अपेक्षा असतात आणि त्यांच्याकडून काही कामे होत नाहीत किंवा त्यांच्या काही भूमिका पटत नाही, त्यावेळी टोकाचा विरोध होता. मी देखील तसा टोकाचा विरोध केला. पण ज्यावेळी त्यांनी चांगले काम केले (राममंदिर, कल ३७०, सीएए) त्यावेळी मी त्यांचे अभिनंदन देखील केले. सध्या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय पक्षाचा मोदींना पाठिंबा असेल” असे राज म्हणाले.

आज कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासे झाले आहे. आज हाणामारी चालू आहेत. पुढच्या विधानसभा निवडणुकीत कोथळे बाहेर काढतील. राजकीय व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका, जर ती मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, अशी विनंती त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांना केली. पण दुसऱ्या बाजूला त्याच घाऊक पक्षांतरातून तयार झालेल्या सरकारला त्यांनी पाठिंबा देऊ केल्याने त्यांची दुटप्पी भूमिका अधोरेखित झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!