Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : मोदींनी रामाच्या नावाने गाजवली पिलिभीतची सभा , म्हणाले इंडिया आघाडीच्या मनात रामाविषयी द्वेष ….

Spread the love

पीलीभीत : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीची काँग्रेस सरकारं जगाकडे मदत मागायची, पण आज भारत जगाला मदत करत आहे. आज भारतासाठी काहीही अशक्य नाही. यावेळी नरेंद्र मोदींनीही राम मंदिराचा उल्लेख केला. काँग्रेसचं मन विषाने भरलं आहे. इंडिया आघाडीतील लोक राम नावाचा द्वेष करतात असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आज जगात भारताचा आवाज घुमत आहे. याचे कारण मोदी नाही. तुमच्या एका मताने हे शक्य झालं. तुमच्या एका मताने मजबूत सरकार बनलं. भारत आज हे दाखवून देत आहे की आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. कधीकाळी काँग्रेसची सरकारं जगाकडे मदत मागायची, पण कोरोनाच्या संकटात भारताने संपूर्ण जगाला औषधं आणि लस पाठवली. जगात जिथे जिथे युद्ध संकट आले तिथून आम्ही प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणलं.

पीलीभीतच्या भूमीला आई यशवंतरी देवीचा आशीर्वाद असल्याचं पंतप्रधान म्हणाले. “येथे आदि गंगा माँ गोमतीचे उगमस्थान आहे. आज, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, मी देशाला आठवण करून देत आहे की इंडिया आघा़डीने शक्तीला संपवण्याची शपथ घेतली आहे. आज देशात ज्या शक्तीची पूजा केली जात आहे तिचा काँग्रेसने घोर अपमान केला आहे. ज्या शक्तीपुढे आपण नमस्कार करतो, त्या शक्तीला उखडून टाकण्याची गोष्ट काँग्रेस नेते बोलत आहेत.”

“आमचे कल्याण सिंहजी यांनी आपलं जीवन आणि सरकार राम मंदिरासाठी समर्पित केलं. देशातील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या समजुतीनुसार योगदान दिलं. पण इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये राम मंदिर उभारणीपूर्वीही द्वेष होता आणि आजही द्वेष आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले, पण जेव्हा देशातील जनतेने एवढे भव्य मंदिर उभारण्यासाठी एक-एक पैसा दिला आणि मंदिरातील जनतेने तुमची सर्व पापं माफ करून तुम्हाला प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित केलं. पण तुम्ही (काँग्रेस) निमंत्रण नाकारून प्रभू श्रीरामाचा अपमान केला आणि प्राणप्रतिष्ठेला गेलेल्या नेत्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली” असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!