Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha NewsUpdate : महायुतीत नाशिक , हिंगोली आणि यवतमाळच्या जागेचा गुंता सुटेना , उमेदवार बदलण्याचा भाजपचा दबाव ….

Spread the love

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा लक्षात घेता महाविकास आघाडी असो की महायुती सर्वच पक्षांनी अखेरपर्यंत आपल्याला हव्या त्या जागा मिळवण्यासाठी चर्चा सुरूच ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वांचेच बैठकांचे सत्र सुरू आहे. महायुतीत, शिंदे गटातील काही उमेदवार बदलण्यासाठी तर काँग्रेसच्या सांगली आणि मुबईतील एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसची अडचण झाली आहे. कारण आता ठाकरे माघार घ्यायला तयार नाहीत काँग्रेस कार्यकर्ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत.

दरम्यान शिंदे गटाने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत आठ उमेदवारांची नाव जाहीर केले आहेत, यात राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य, संजय मंडलीक – कोल्हापूर, सदाशिव लोखंडे – शिर्डी, प्रतापराव जाधव – बुलढाणा, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीरंग बारणे – मावळ, राजू पारवे – रामटेक, धैर्यशिवाय शिल माने – हातकणंगले या उमेदवारांचा समावेश आहे. आता दोन दिवसात शिंदे गट आणखी एक यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही जागांवर भाजपाने उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. आज दिवसभर मुख्यमंत्री निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू आहे. आज तीन जागांसाठी बैठका सुरू आहेत. नाशिकसाठी हेमंत गोडसे, हिंगोलीसाठी हेमंत पाटील तर यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळी या जागांसाठी बैठका सुरू आहेत.

कारण नाशिक, हिंगोली, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातील उमेदवार बदला अशी मागणी भाजपाने केली असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, आता यवतमाळ-वाशिम लोकसभासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. भावना गवळी यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार आहे. गवळींच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपाने शिंदे गटावर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

वर्षा बंगल्यावर आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे २० पदाधिकारी आले आहेत. मंत्री दादा भुसे यवतमाळचा दौरा रद्द करुन उशीरा वर्षा बंगल्यावर दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान “नाशिकची जागा पारंपारिकरित्या शिवसेनेकडे असताना ही जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. पहिलं प्राधान्य शिवसेनेला राहणार आहे. ही चर्चा राज्यस्तरीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी आग्रही आहेत, अशी प्रतिक्रिया नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!