राज्यातील शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला… तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार

राज्यातील शिक्षक भरती परीक्षांची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी महत्वाची बातमी. महाराष्ट्रात तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. आपण अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेली शिक्षकांच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षक भरती परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे.
टीईटी उत्तीर्ण झाल्यावर सीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. यात उत्तीर्ण झालेल्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. असे असले तरी शिक्षक भरती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. अगदी 2 ते 3 टक्के परीक्षार्थी यात उत्तीर्ण होतात. त्यामुळे अधिक जागा भरण्याची जाहिरात दिल्यानंतरही अनेक जागा रिक्त राहतात.
सध्या 13 हजार 500 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यानंतर राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आता काही कालवधीनंतर शिक्षण विभागाने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षक भरती परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765