Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

होळी निमित्त साड्या वाटप… साडी आहे की मच्छरदाणी? आदिवासी महिलांना पडला प्रश्न

Spread the love

दरवर्षी होळीच्या निमित्ताने अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत हा सण साजरा करतात. यावेळी होळीच्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होळी आधीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मेळघाटमध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली.

यावेळी राणा दाम्पत्याने तिथे असलेल्या महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र यावेळी मेळघाटामध्ये वाटलेल्या साड्यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. या साड्यांनी आदिवासी महिलांची पुरती निराशा केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

राणा दाम्पत्याने दिलेल्या साड्या पाहून आदिवासी महिलांना प्रश्न पडला आहे, की ही साडी आहे की मच्छरदाणी? कारण अतिशय निकृष्ट दर्जाच्या या साड्या असल्याचे या आदिवासी महिला सांगत आहेत.

या साड्यांमुळे आदिवासी बांधवांनी राणा दाम्पत्याबद्दल रोष व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर यातील अनेक साड्या फाटलेल्या आहेत. त्या महिलांना घालण्यायोग्यही नसल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे आदिवासी महिलांची थट्टा राणा दाम्पत्याने चालवली असल्याचे यावेळी म्हटले जात आहे. साड्या वाटून आदिवासी लोकांना मतांसाठी आमिष दाखवले जात असल्याचा आरोपही होऊ लागला आहे.

राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्यासारख्या नसल्याचे या महिलांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा साड्या वाटप करून तुम्ही आमची थट्टा लावली आहे का? असा सवाल देखील काही महिलांनी उपस्थित केला आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!