Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कमाल झाली !! आमदार नसतानाही भाजपने या नेत्याला ४-४ मंत्री पदे देऊनही ते पोट निवडणूक हरले आणि काँग्रेस जिंकली !!

Spread the love

जयपूर : भाजपने बहुमताने राजस्थान जिंकल्यानंतर दहा दिवस आधी, भाजपने ज्या सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राजस्थान सरकारमध्ये ४-४ खात्याचे मंत्री केले. त्यांचाच पोट निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. खरे तर भाजपच्या या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता कारण सुरेंद्र पाल निवडणूक न लढवता मंत्री झाले होते. दरम्यान भाजपने नंतर करणपूर पोटनिवडणुकीत सुरेंद्र पाल सिंग टीटी यांना उमेदवारी दिली. टीटीला मंत्री केल्यावर टीटीच्या विजयाच्या आशा बऱ्यापैकी वाढतील असे पक्षाला वाटत होते, पण तसे झाले नाही आणि भाजपची रणनीती सपशेल फसली.

मंत्री झाल्यानंतर सुरेंद्र पाल सिंह यांना आपल्या विजयाची खात्री होती. श्रीकरणपूरचे मतदार अतिशय हुशार आहेत, ते निवडणुकीत नक्कीच जिंकतील, असे ते म्हणाले होते. पक्षाने आपल्या माध्यमातून शीख समाजाचा सन्मान केल्याचे ते म्हणाले होते. भाजपने सर्व ३६ समाजांना सोबत घेतले आहे. गेल्या महिन्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कुणार यांच्या निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. या जागेवरून काँग्रेसने कुनर यांचे पुत्र रुपिंदर सिंग यांना उमेदवारी दिली होती.

वास्तविक, भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुरेंद्र पाल सिंह टीटी हे सुरुवातीच्या फेरीतच मागे पडले होते. रात्री ११.५० वाजता करणपूर जागेवर भाजपचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंह टीटी ३ हजार मतांनी पिछाडीवर होते. यानंतर मतमोजणीच्या ९व्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह ४८०२ मतांनी आघाडीवर होते. त्यांना ४७९३० मते मिळाली. तर भाजपचे सुरेंद्र पाल यांना ४३१२८ मते मिळाली. यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास अंतिम निकालही जाहीर झाला आणि टीटीला पराभवाला सामोरे जावे लागले.

भजनलाल यांनी १५ डिसेंबरला घेतली होती शपथ…

नियमानुसार मंत्री झाल्यानंतर सुरेंद्र पाल सिंह यांना आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. १५ डिसेंबर रोजी भाजपचे भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

टीटींच्या शपथेवर काँग्रेसचा होता आक्षेप…

यापूर्वी राज्यात एकूण १९९ जागांवर विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, ज्यामध्ये भाजपने ११५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा सुरेंद्र पाल सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर काँग्रेसनेही आक्षेप घेतला होता. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. उमेदवाराच्या विजयाचा किंवा पराभवाचा निकाल लागण्यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेणे बेकायदेशीर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!