Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalIndiaUpdate : तेलंगणा विधानसभा विशेष : पती , पत्नी , भाऊ- भाऊ, पिता पुत्र, १५ डॉक्टर जिंकले… !!

Spread the love

हैद्राबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत  काही लढती लक्षवेधी ठरल्या त्यात १५ डॉक्टर विजयी झाले तर पती , पत्नी आणि दोन भाऊही आमदार झाले. यामध्ये  सीएम केसीआर, गजवेल जागेवरून विजयी झाले आहेत आणि त्यांचा मुलगा आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव सिरिल्लामधून विजयी झाले आहेत. केसीआर यांचे पुतणे आणि राज्याचे आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी सिद्धीपेटमधून निवडणूक जिंकली आहे.

काँग्रेस ​​पक्षाचे खासदार एन उत्तम कुमार रेड्डी यांना हुजूरनगर मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी एन पद्मावती यांना कोडाड मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. हैदराबादच्या मलकाजगिरी मतदारसंघातून आमदार हनुमंत राव यांचा पराभव झाला असून त्यांचा मुलगा रोहित राव मेडक मतदारसंघातून निवडणूक जिंकला आहे.

कमरेड्डीत केसीआर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवन्त रेड्डी यांचा भाजपचे उमेदवार व्यंकट रामण्णा रेड्डी यांनी पराभव केला. तर केसीआर गजवेलमधून विजयी झाले. भाजपचे वादग्रस्त नेते टी राजा विजयी तर माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजयकुमार पराभूत . माजी क्रिकेटपटू काँग्रेस नेते अझरुद्दीन यांचा पराभव. असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांचा तिसऱ्यांदा विजय.

हनुमंत राव याआधी बीआरएसमध्ये होते आणि पक्षाने त्यांना पुन्हा मायापल्ली मतदारसंघातून तिकीट दिले होते पण हनुमंत राव यांनी बीआरएस सोडले. काँग्रेसने हनुमंत राव आणि त्यांच्या मुलालाही तिकीट दिले होते. काँग्रेसचे जी विवेकानंद चेन्नूरमधून तर त्यांचे बंधू विनोद बेल्लमपल्लेमधून निवडणूक जिंकले आहेत.

15 डॉक्टरही झाले आमदार, त्यापैकी 11 काँग्रेसचे…

डॉ रामचंद्र नाईक, एमएस जनरल सर्जन, दोरनाकल, काँग्रेस
डॉ. वामकृष्णा, एमएस जनरल सर्जन, अचम्पेटा, INC
डॉ. मुरली नाईक, एमएस जनरल सर्जन, महबूबाबाद, काँग्रेस
डॉ.सत्यनारायण, एमएस जनरल सर्जन, मानकोंडूर, काँग्रेस
डॉ. मैनमपल्ली रोहित राव, एमबीबीएस, मेडक, INC
डॉ. पर्णिका रेड्डी, जनरल फिजिशियन, नारायणपेठ, काँग्रेस
डॉ.संजीव रेड्डी, बालरोगतज्ज्ञ, नारायणखेड, काँग्रेस.
डॉ. विवेक व्यंकटस्वामी, MBBS, चेन्नूर, INC
डॉ.भूपती रेड्डी, एमएस ऑर्थो, निजामाबाद ग्रामीण, काँग्रेस
डॉ. कुचुकुल्ला राजेश रेड्डी, एमडीएस, नगरकुर्नूल, काँग्रेस
डॉ. रागामाई, एमडी पल्मोनोलॉजिस्ट, सत्तुपल्ली, काँग्रेस
डॉ थेलम वेंकट राव, एमएस ऑर्थो, भद्राचलम, बीआरएस
डॉ.संजय कुमार, एमएस नेत्ररोग, जगत्याला, बी.आर.एस
डॉ. कलवकुंतला संजय, एमसीएच न्यूरो, कोरुटला, बीआरएस
डॉ.पालवाई हरीश, एमएस ऑर्थो, सिरपूर, भाजप

आपलं सरकार

Click to listen highlighted text!