Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : भाजपाच्या विजयामागे खोटा प्रचार हे प्रमुख कारण, लोकशाही धोक्यात आहे , बोलले अशोक गेहलोत …

Spread the love

जयपूर : “पराभवाच्या दु:खापेक्षा देशाची जास्त चिंता आहे. लोकशाही धोक्यात आहे.” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे . दरम्यान आपण राजकारणातून ब्रेक घेण्याच्या मनस्थितीत नसून मी एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जनतेची सेवा करत राहीन. लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करावी, असे आवाहन मी सर्वांना केले आहे. निकाल कॉंग्रेसच्या विरोधात लागला असला तरी राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट नव्हती असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. 

मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये त्यांना शंका होती, मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं, मात्र तसं झालं नाही. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस पक्षाचा भाजपाकडून पराभव झाला आहे.

भाजपाच्या विजयामागे खोटा प्रचार हे प्रमुख कारण

दरम्यान आपल्या राज्याच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की , “राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे म्हणत होते. भाजपाच्या विजयामागे खोटा प्रचार हे प्रमुख कारण आहे. भाजपा विकास आणि सरकारी कामावर बोलण्याऐवजी कन्हैया लालच्या मुद्द्यावर खोटे बोलली. हे भाजपाच्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही. निवडणुका खोट्याच्या आधारे लढल्या गेल्या.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!