Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CWCMeetingNewsUpdate : महिला आरक्षण विधेयकासोबतच काँग्रेसने आरक्षित वर्गांसाठी केली मोठी मागणी…

Spread the love

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबादमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने जात जनगणना करण्याची तसेच अनुसुचित जाती , जमाती, आदिवासी आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. CWC ने या बैठकीत 14 कलमी प्रस्ताव मांडला असून आपल्या ठरावात, CWC ने वाढती बेरोजगारी आणि विशेषत: जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सतत होणारी वाढ यावर गंभीर चिंता व्यक्त केली. या ठरावात मणिपूरमधील घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्याने आणि सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले.

यासोबतच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात आली. या बाबतच्या ठरावात असे म्हटले आहे की, CWC अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , आदिवासी आणि OBC साठी आरक्षणाची विद्यमान वरची मर्यादा वाढवण्याची मागणी करते.

या संदर्भात काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेरा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार विधानसभेत सर्व जातींना संख्यात्मक वाटा मिळावा म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.

ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजपला थेट आव्हान देत आहे, त्या राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचा कल त्याकडे असल्याचे मानले जाते. दरम्यान अनुसूचित जाती आणि आदिवासी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार असून काँग्रेसचे अध्यक्ष खरगे हे स्वतः मागास समाजातून आलेले आहेत.

जातीय जनगणनेद्वारे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी, काँग्रेसचे खरे लक्ष्य ओबीसी व्होटबँकेवर आहे, जिथे भाजप खूप मजबूत आहे. महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर आरक्षण कार्ड काम केले तर ते टेबल फिरवू शकते, असे काँग्रेसला वाटते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!