Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | Top News | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

#MahanayakOnline | Top News | 08.August.2023


• ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

• शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी १० लाख कोटी रुपय अनुदानाची तरतूद करण्यात आली असून, युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रुपये असताना, शेतकऱ्यांना तो ३०० रुपयांना उपलब्ध करून दिला असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

• मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका, आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू, आज पावसाचा रेड अलर्ट

• आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. सामाजिक, राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून आजपासून बैठका, मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा; आज दिवसभरात…

 

• राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. ते भाजपसोबत आल्यास त्यांना केंद्रात कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात येईल अशी ऑफर भाजपने दिली आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

 

• अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. २०२० साली निवडणूक निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

आता याप्रकरणी जॉर्जियातील एका न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.  जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या १८ साथीदारांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांना सर्वांना आत्मसमर्पण करण्यासाठी पुढील शुक्रवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत या सर्वांना दिली गेली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रँड ज्युरी यांनी १३ गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये RICO, खोटी कागदपत्रं दाखल करणे, सार्वजनिक अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचं उल्लंघन करणं आणि इतर आरोपांचा समावेश आहे.

 

• Today in History : अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन
भारताचे दहावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले होते.

 

• जागे व्हा.. नाहीतर ९० दिवस जेलमध्ये बसा… – जितेंद्र आव्हाड

 

• सगळे भारतीय माझे कुटुंब आहे… मी तुमचे दुःख सहन करु शकत नाही – नरेंद्र मोदी

 

• MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार – अजित पवार भेटीवरून महाविकास आघाडीत धुसफूस

 

• Independence Day Update : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

 


#Live Mahanayak news Updates | Top News | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

www.mahanayakonline.com

For News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!