Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्वातंत्र्यदिन सोहळ्याला का अनुपस्थित राहिले मल्लिकार्जुन खर्गे

Spread the love

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केले. पंतप्रधान म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेले मोदी यांचे हे दहावे संबोधन ठरले आहे.

अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मात्र मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थित राहिल्याने त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. खर्गे यांच्या अनुपस्थितीवरून आता भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना, कोंग्रेसवर टीका केली आहे. “देशातील प्रमुख विरोधी पक्षाचा अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहत नाही, यावरून तुम्ही काँग्रेसचे विचार ओळखू शकता. मासा जसा पाण्याविना तडफडतो तशीच काँग्रेस सत्तेविना तडफडते आहे.” असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. “माझ्या डोळ्याला दिसण्यासंबंधित थोडा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला ९.२० वाजता माझ्या घरी आणि नंतर काँग्रेस मुख्यालयावरही तिरंगा ध्वज फडकवायचा होता.

लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था एवढी कडक आहे की, पंतप्रधान गेल्याशिवाय तिथून दुसऱ्या कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्यामुळे, कदाचित मी येथे वेळेत पोहोचू शकलो नसतो. म्हणून सुरक्षा यंत्रणेची स्थिती आणि वेळेची कमतरता लक्षात घेऊन मी तिथे न जाण्याचे ठरवले.” असे खर्गे यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पुढील वर्षीही लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करू असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास दर्शवला.

मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ‘मोदी पुढील वर्षी तिरंगा फडकावतील, मात्र आपल्या घरावरून लाल किल्ल्यावरून नाही’ असा टोलाही लगावला आहे.

सगळे भारतीय हे माझे कुटुंब आहेत… मी तुमचे दुःख सहन करु शकत नाही – नरेंद्र मोदी

 


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!