Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CourtNewsUpdate : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा ? सुनावणीला सर्वोच्च न्यायलयाचा हिरवा कंदील

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली आहे . यावर येत्या ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. येत्या ३१ तारखेला सूचीबद्ध करू, असे कोर्टाने म्हटले आहे.

एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी गतवर्षी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. कालांतराने त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व निवडूक चिन्हही दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय निकाली निघेपर्यंत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच पक्षातील बहुतांश सदस्य आमच्या बाजूने असूनही आयोगाने शिंदेंना नाव व पक्षचिन्ह बहाल करण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!