Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आयशर टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात चार जण जागीच ठार

Spread the love

बीड जिल्ह्यामध्ये कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनीजवळ आयशर टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडी समोरासमोर धडकल्या. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत, तर इतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीडहून नगरकडे निघालेला टेम्पो आणि नगरहून गेवराईकडे निघालेली स्कॉर्पिओ यांच्यामध्ये हा अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये चार जण जागीच ठार झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृत्यू झालेले सगळे जण गेवराई तालुक्यातील मारफळा गावचे रहिवासी असल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे अजून समजू शकलेली नसून  हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!