Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MonsoonUpdate : पाऊसचा जोर वाढल्याने तीन दिवसांसाठी या भागात आँरेज अलर्ट

Spread the love

मान्सून लांबल्यामुळे सर्वांच्याच आशा आभाळाकडे लागून होत्या, मात्र सध्या पाऊस सुरू झाला असला तरी समाधानकारक होत नाही. दरम्यान अशातच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता.२८) पासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी, सिंधुदूर्ग यासह अन्य कोकणपट्ट्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चकीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई, रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापुरातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे. तीन दिवसांसाठी आँरेज अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

पुढच्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील भंडारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नागपुरातही रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

सध्याच्या पावसाची शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. तसेच नागपूर हवामान विभागाकडून पुढचे २४ विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान मागच्या २४ तासांपासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम झाली. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणीची तयारी करू लागला आहे. शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण असते. धुळ्यातील धुळे, शिरपूर, साक्री, जळगावमधील धरणगाव, चोपडा, जळगाव, भुसावळ, जामनेर, रावेर भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. सुरुवातीला सुसाट वारा होता. नंतर पावसाला सुरुवात झाली पण जोरदार पाऊस बरसला नाही. राज्यातील सर्वाधीक कमी पावसाचे प्रमाण खानदेशात होत असल्याचे दिसून येत आहे. या भागात पेरणीयोग्य पाऊस कुठेही झाला नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. रविवारपासून खानदेशात वातावरणात बदल झाला आहे. पाऊस येईल, याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (ऑफ शोअर ट्रफ) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

– कोकण, गोवा (रेड अलर्ट) : दि. 29 जून ते 3 जुलै.
– कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट : (रेड अलर्ट) : 48 तास.
– मध्य महाराष्ट्र : 29 व 30 जून : (मुसळधार).
– मराठवाडा : 29 व 30 जून : (मध्यम पाऊस)
– विदर्भ : 29 व 30 जून : (मध्यम पाऊस)

 

 


CourtNewsUpdate : बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही घरात कुर्बानी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी : मुंबई उच्च न्यायालय

 

#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!