सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या जनतेला केले शांततेचे आवाहन

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात येथील जनतेला एका व्हिडीओ याद्वारे शांततेचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमधील लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अभूतपूर्व हिंसाचाराने आपल्या देशाच्या विवेकावर खोल जखमा केल्या आहेत. लोकांना घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले हे पाहून मला खूप दुःख झाले आहे.
The unprecedented violence that has devastated the lives of people in Manipur has left a deep wound in the conscience of our nation.
I am deeply saddened to see the people forced to flee the only place they call home.
I appeal for peace and harmony. Our choice to embark on the… pic.twitter.com/BDiuKyNGoe
— Congress (@INCIndia) June 21, 2023
सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जवळपास ५० दिवसांपासून आपण एक मोठी मानवी शोकांतिका पाहिली आहे. या हिंसाचारामुळे राज्यातील हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या हिंसाचारात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती मी शोक व्यक्त करतो. शांततेने जगणारे आपले बंधू-भगिनी एकमेकांच्या विरोधात जात आहेत हे पाहून मन हेलावते, असंही गांधी म्हणाल्या. तसेच मणिपूरचा इतिहास सर्व जाती, धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा आणि विविध समाजाच्या असंख्य शक्यतांचा साक्ष देतो. बंधुभावाची भावना जोपासण्यासाठी प्रचंड विश्वास आणि सद्भावना आवश्यक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. एक चुकीचे पाऊल द्वेष आणि विभाजनाची आग पेटवण्यासाठी पुरेसे आहे.
मी मणिपूरच्या लोकांना, विशेषत: माझ्या धाडसी भगिनींना या सुंदर भूमीत शांतता आणि सौहार्दाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करते. एक आई म्हणून मला तुमची वेदना समजते आणि तुम्ही योग्य मार्ग काढताल अशी मला आशा आहे. मला आशा आहे की पुढच्या आठवड्यात, महिन्यांत आम्ही विश्वासाच्या पुनर्निर्माणाच्या दीर्घ प्रवासाला सुरुवात करू. मला मणिपूरच्या लोकांवर अपार आशा आणि विश्वास आहे आणि मला माहीत आहे की एकत्रितपणे आपण या परीक्षेवर मात करू, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात राज्य सरकारचा निर्णय
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055