Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

८८ हजार ३२ कोटी ५०० रुपयांच्या नोटा गायब… आरबीआयचे स्पष्टीकरण

Spread the love

सिस्टिममधून ८८ हजार ३२ कोटी रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा चलनात येण्यापूर्वीच गायब झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते दरम्यान रिझर्व्ह बँकेने या सर्वावर स्पष्टीकरण दिले असून हि बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमधील काही गटांनी प्रिंटिंग प्रेसमधून बँकेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त दिले होते. ह्या बातम्या माहितीचा अधिकार काद्यांतर्गत प्रिंटिंग प्रेसमधून मिळवलेल्या माहितीची चुकीची व्याख्या करून प्रसारित करण्यात आल्या, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, प्रिंटिंग प्रेसमधून आरबीआयला पाठवलेल्या सर्व नोटांचा योग्य हिशोब ठेवला जातो. प्रेसमध्ये छापलेल्या आणि आरबीआयकडे पाठवलेल्या नोटांची योग्य तपासणी करण्याची भक्कम व्यवस्था आहे. त्यामध्ये उत्पादनाच्या देखरेखीसह नोटांच्या विवरणासाठी प्रोटोकॉलचा समावेश आहे. अशा प्रकरणांमध्ये आरबीआयकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवा, असे आवाहनही रिझर्व्ह बँकेने जनतेला केले आहे.

काही प्रसार माध्यमांनी रिझर्व्ह बँकेच्या छापखान्यात छपाई झाल्यानंतर ५०० रुपयांच्या हजारो कोटी मूल्य असलेल्या नोटा गायब झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. या वृत्तामध्ये मनोरंजन रॉय यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या आकडेवारीचा हवाला देण्यात आला होता. यामध्ये ८८ हजार ३२ कोटी रुपये मूल्य असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा गायब आहेत, असा दावा करण्यात आला होता. माहिती अधिकार कार्यकर्त्याने दावा केला होता की, एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ यादरम्यान, नाशिकच्या टांकसाळीत छापण्यात आलेल्या २१० मिलियन नोटा गायब आहेत. नाशिकच्या करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१६ यादरम्यान ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या ३७५.४५० दशलक्ष प्रती छापण्यात आल्या होत्या. मात्र आरबीआयच्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ दशलक्ष नोटाच दिसत आहेत. या नोटा रघुराम राजन गव्हर्नर असताना आरबीआयला देण्यात आल्या होत्या.

#MahaClassified – RBI मध्ये नोकरीची संधी ३३६ रिक्त पदांची नवीन भरती

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!