Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BigBreakingNewsUpdate : बाहुबली नेता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या , उत्तर प्रदेशात सर्वत्र 144 कलम लागू ..

Spread the love

प्रयागराज : खुनाच्या आरोपावरून उत्तर प्रदेश  पोलिसांच्या ताब्यात असलेला बाहुबली नेता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी (15 एप्रिल) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोघांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे वैद्यकीय चाचणीसाठी नेले जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कथितरित्या काही दुचाकीस्वारांनी अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी न्यायालयीन चौकशीसाठी तातडीने आयोग घोषट केला असून संपूर्ण उत्तर प्रदेशात 144 कलम लागू केले आहे.


https://twitter.com/ANI/status/1647305847049969664

प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलजवळ पोलिस आणि मीडिया उपस्थित असताना हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणली. यावेळी तिन्हीही  हल्लेखोरांना  पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात एक पोलीस हवालदार मान सिंह देखील जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  न्यायालयीन आयोगाची घोषणा केली आहे.

सरकारच्या वतीने एका निवेदनात म्हटले आहे की ,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमधील घटनेची गंभीर दखल घेत तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. तीन सदस्यीय न्यायिक आयोग (न्यायिक चौकशी आयोग) स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तिन्ही हल्लेखोर घटनास्थळीच पकडले गेले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुसरीकडे, प्रयागराजमधील घटनेनंतर लखनौ आयुक्तालय पोलीस सतर्क झाले आहेत. एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा जुन्या लखनौच्या हुसेनाबादमध्ये पायी गस्त घालत होते. लोकांशी बोलून गर्दी निर्माण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घाबरून जाऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांनीही परिसराचा आढावा घेतला.

प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद

यासोबतच अतिक आणि अश्रफ यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या 17 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. यासह संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना ड्युटीवर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना तातडीने परिसरात जाण्यास सांगण्यात आले. यूपीमध्ये पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर गेलेल्यांना परत बोलावण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिव विशेष विमानाने प्रयागराजला जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की , त्यांचा (अतीक आणि त्याचा भाऊ) खून हे योगींच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मोठ्या अपयशाचे उत्तम उदाहरण आहे. तसेच एन्काउंटर-राज साजरा करणारे या हत्येला तितकेच जबाबदार आहेत. ज्या समाजात खुन्यांना महत्व  केले जाते, तेथे फौजदारी न्याय व्यवस्थेचा उपयोग काय ?

आपलं सरकार

Click to listen highlighted text!