देवळा मनमाड मार्गावर भीषण अपघात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू
नाशिक जिल्ह्यात देवळा मनमाड मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील एका महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवासी जखमी असल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला आहे. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील सुमारे २२ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती. तिकडून परतत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ अपघात झाला. समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.
#MahanayakOnline : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481