दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली आहे.
उदय सामंत यांनी सांगितलं की, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून राज्यात सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे अशी माहितीहि उदय सामंत सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
सामंजस्य करार करण्यात आलेल्या कंपन्या :
- ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड : १२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात अली आहे.
- हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया : १६ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात अली आहे.
- आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल : १६ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
- रुखी फुड्स : २५० कोटींची गुंतवणूक करण्यात अली आहे.
- निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड : १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक करण्यात अली आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड, अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी घोषित
#MahanayakNews #NewsUpdate #Internationalnews #Currentnews #Currentnewsupdtae #Newsupdate #Eknathshinde #Udaysamant #Maharashtragovernment #Maharashtra
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055