Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, ३८ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजन होणार आहे. मोदींच्या हस्ते ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच, यावेळी १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित होणार आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी ४ वाजता मोदी यांची सभा पार पडणार आहे. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात अली आहे. दरम्यान, या सभेसाठी २५० हून अधिक बस बूक कऱण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून या एसटी बस मुंबईत दाखल होणार आहेत.


 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ते ६.१० एमएमआरडीए मैदानवरती लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहतील. संध्याकाळी ६.३० पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन – ६.३० ते ७ मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार. संध्याकाळी ७.५ मेट्रो स्टेशन मधून निघणार ७.१५ मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील. सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-१ ची संध्याकाळी ५.४५ ते ७.३० पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.

 

  • थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, स्वागताची जय्यत तयारी

  • पंतप्रधानांच्या सभेसाठी जबरदस्तीने फेरीवाल्यांना नेलं जातंय, ठाकरे गटाचा आरोप

 

  • अंबादास दानवे: मुंबई पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे, असे शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे म्हटले आहे.

 

  • मुळेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकलेले दिसत आहे. हे पोस्टर मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे पोस्टर्स नेमके कुणी लावले असा प्रश्न पडला असून याकडे सर्वच मुंबईकरांचे लक्ष जात आहे.

 

  • खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे.

  • पंतप्रधान मुंबईत आले म्हणजे मुंबई पालिकेची निवडणूक लागेल असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

 

  • पार्कींगची सुविधेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी, यासाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विविध विद्यार्थांंनी आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी महापालिकेला विचारला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींग सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही भिंत तोडण्यात आली असून आजच्या कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भित पुन्हा बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

  • मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवलीमधून तब्बल १०० हून अधिक बसेस सभेसाठी रवाना होणार आहेत. यामधील कल्याण पूर्वेतून ४० , तर डोंबिवली मधून ४० बसेस तसेच काही कार्यकर्ते खासगी गाड्यांनी मुंबई गाठणार आहेत. तब्बल दीड हजार कार्यकर्ते डोंबिवली कल्याण ग्रामीण तर दीड ते दोन हजार कार्यकर्ते कल्याणमधून मुंबई येथे धडकणार आहेत.

 

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मुंबईत साडेचार हजार पोलिस तैनात राहणार असून भाजपचे स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत. तसेच, या सभेला दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

भाजपा नेत्यांना, पंतप्रधानांचा मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला

#PM #NarendraModi #Eknathshinde #Mumbai #Maharashtra #Maharashtrapolitics  #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews #नरेंद्रमोदी

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!