Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जिप आणि कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू १२ जण जखमी

Spread the love

परळी वैजनाथ, गंगाखेड रोडवर दादाहरी वडगाव येथे आणखी एका क्रूझर जिप आणि स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात का झाला यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले असून संबंधित दोषींवर कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मंगळवार (१० जानेवारी) रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान परळी वैजनाथ -गंगाखेड रोडवर दादाहरी वडगावच्या जवळ परळीकडून वडगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर (एम.एच. २६ एके २६६६) आणि क्रुझर जीप (एम.एच. २० इजे १०८४) यांचा भीषण अपघात झाला आहे. यात अपघातात दादाहरी वडगाव येथील किशन इंगळे (वय ३२) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर जीपमधील सुमारे १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. थर्मलच्या राखेमुळे वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला. तर दुसरीकडे अपघाताच्या जवळच असलेल्या रस्त्यालगत पेट्रोल पंपाचे मालकाने अनाधिकृतपणे पाईपलाईनसाठी रस्ता फोडला. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडला आणि हा खड्डा भरून घेतला नाही त्यामुळे हा अपघात झाला असेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे. यावरून रात्री मोठा वाद विवाद नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोकोदेखील केला आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेला राखेचा डोंगरही धोकादायक आहे. राख हवेमुळे परिसरात पसरत असल्याने वाहन चालकांना समोरच्या वाहनांचा अंदाज न आल्याने याआधीदेखील अनेक अपघात झाले आहेत.

या घटनेनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले झाले होते. मात्र संतप्त नागरिकांनी अपघात झाला त्याच ठिकाणी रास्ता रोको सुरू केला. पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको मागे घेण्यात आला. यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीदेखील झाली होती. मात्र परळी येथील थर्मलमधून निघणाऱ्या राखेमुळे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!