Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात , ३ ठार ४ जखमी

Spread the love

मुंबई : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चारोटी जवळील श्री महालक्ष्मी मंदिर जवळ पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय भिलाड (गुजरात) येथे जात असताना दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.


मृतांमध्ये १. नरोत्तम छना राठोड (६५), २. केतन नरोत्तम राठोड (३२), ३. आर्वी दीपेश राठोड (०१) यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये १. दीपेश नरोत्तम राठोड (३५), २. तेजल दीपेश राठोड (३२), ३. मधु नरोत्तम राठोड (५८), ४. स्नेहल दीपेश राठोड (२.५) यांचा समावेश आहे. गाडीचा चालक दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने पुढे असलेल्या कंटेनर ट्रकला मागच्या बाजूने या कार ने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. जखमींपैकी दोघेजण गंभीर असल्याने त्यांना वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यामध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!