IndiaNewsUpdate : धक्कादायक : बापरे बाप !! कुत्रे झाले मानवभक्षक , नऊ जणांचा घेतला बळी…१६ कुत्र्यांना घातल्या गोळ्या….
बेगुसराय : बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बछवाडा आणि भगवानपूर ब्लॉकमध्ये सध्या कुत्र्यांची दहशत आहे. मानवभक्षक कुत्र्यांनी आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर कुत्रा चावल्याने आतापर्यंत ४० जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आता प्रशासन कारवाईत आले आहे. आतापर्यंत ३७ कुत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने पाटणा येथून नेमबाजांना पाचारण केले आहे. तरीही नेमबाज या मानवभक्षक कुत्र्यांचा खात्मा करण्यात व्यस्त आहेत.
कुत्र्यांच्या त्रासाला तोंड देण्यासाठी स्थानिक लोकांनी तेघरा उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. यामध्ये कुत्र्यांच्या दहशतीपासून लोकांना वाचविण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यानंतर प्रशासनाने या समस्येबाबत वन व पर्यावरण विभागाला पत्र पाठवले होते. तेव्हापासून परिसरातील कुत्र्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. या प्रकरणाबाबत बेगुसरायचे एडीएम राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्यांना गोळ्या घालण्याची कारवाई केली जात आहे. पहिल्याच दिवशी १२ कुत्रे मारले गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी १६ कुत्र्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्याचवेळी बुधवारी सुमारे नऊ कुत्रे दगावले आहेत.
२४ हून अधिक जखमी…
पुढे एडीएमने सांगितले की, मानव भक्षक कुत्र्यांच्या दहशतीमुळे सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत प्रशासन सतर्क आहे, जेणेकरून लोक सुरक्षित राहतील. दुसरीकडे, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ११ मे रोजी बचवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कादराबाद येथे कुत्र्यांनी जानकी देवीला चावा घेऊन जखमी केले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ७ डिसेंबर रोजी बचवाडा ब्लॉकच्या कादराबादमध्ये शांती देवी नावाच्या महिलेला कुत्र्यांनी चावा घेतला होता. १७ डिसेंबर रोजी बचवाडा ब्लॉकमधील बचवारा गावात मीरा देवी, बचवाडा येथील रुदौली पंचायतीच्या प्रभाग एकमधील गिरजा देवी, १७ डिसेंबर रोजी रुदौली पंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये गणेश महतो यांना ओरबाडून जखमी करण्यात आले होते. एकूण, २४ हून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला.