HingoliNewsUpdate : नागरी सुविधांचा अभाव, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे रुग्णांची हेळसांड….

हिंगोली /प्रभाकर नांगरे : हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरी सुविधांचा अभाव चव्हाट्यावर आला आहे. वॉर्ड मध्ये चक्क वॉर्ड सेवक उपब्ध नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक यांच्यावरच रुग्णांना सोनोग्राफी, एक्सरे, सी. टी.स्कॅन आदी ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. ज्या रुग्णांन सोबत कुणीच नाहीत त्यांना भिंतीचा सहारा घेत किंवा लंगडी करत उपचार घ्यावा लागत आहे. वॉर्ड मध्ये शुद्ध पिण्याचे पाणीही वेळेवर मिळत नाही, बेडवरती बेड शीट नसणे या शिवाय बाथरूम, संडास मध्ये चक्क घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
यावर नर्सशी विचारणा केली असता त्यांनी सहा महीन्या अगोदर पासून वॉर्ड मध्ये म्यान पॉवर वाढवून मिळणे, रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, अशा अनेक मागणीचे पत्रके दाखविली असून यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.
अपघात झालेल्या रुग्णांना लिफ्ट म्यान नसल्या मुळे चक्क वरच्या माल्याहुन खाली येण्या साठी कसरत करावी लागते. एकंदरीतच रुग्णांची हेळसांड कधी थांबणार हा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. सदरील बाबींकडे संबंधित अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.