ElectionNewsLiveUpdate : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर तर हिमाचलमध्ये काँग्रेस -भाजपमध्ये टक्कर …

नवी दिल्ली : बहुचर्चित गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या तासात हाती आलेल्या कलानुसार गुजरातमध्ये भाजप पुढे जात असल्याने भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही आजच मतमोजणी होत आहे. गेल्या २७ वर्षांपासूनची सत्ता पुन्हा भाजप कायम ठेवणार का ? याचा निकाल आज लागणार आहे . या निकालात आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसला किती जागा मिळणार ? याकडेही देशाचे लक्ष्य लागले आहे. विशेष करून गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला लागली आहे.
LIVE ASSEMBLY ELECTION RESULTS
गुजरात : BJP 00 | AAP 00 | INC 00 | OTH 00 | TOT 182
विजयी : BJP 156 | AAP 05 | INC 17 | OTH 04 | TOT 182
हिमाचल प्रदेश: BJP 00 | AAP 00 | INC 00 | OTH 00 | TOT 68
विजयी : BJP 25 | AAP 00 | INC 40 | OTH 03 | TOT 68
I have handed over my resignation to the Governor. Will never stop working for the development of people. We need to analyse things. There were some issues that changed the direction of the results. I will go to Delhi if they call us: Outgoing Himachal Pradesh CM Jairam Thakur pic.twitter.com/gOAIS5pBo4
— ANI (@ANI) December 8, 2022
#GujaratElections | A man from Odisha, Mohan Mohapatra, painted himself silver amid celebrations over BJP victory in Gujarat Assembly polls, in Ahmedabad. pic.twitter.com/xE5lXU3HJn
— ANI (@ANI) December 8, 2022
-
हिमाचल प्रदेश : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्वत:च्या राज्यातच पराभव काँग्रेसने मारली बाजी
-
उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपचे गुजरातमधील विजयाबद्दल अभिनंदन
-
मतमोजणीच्या कलांनुसार मोरबीमधून भाजपचे उमेदवार कांतिभाई अमृतिया आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून जयंती पटेल काँग्रेसच्या उमेदवार असून आम आदमी पक्षानं पंकज रंसरिया यांना उमेदवारी दिली आहे. कांतिभाई अमृतिया पुल दुर्घटनेनंतर चर्चेत होते.
-
हिमाचल प्रदेश निवडणूक निकालात काँग्रेसची मोठी आघाडी, 40 जागांवर पुढे तर भाजपला 25 जागांवर आघाडी
-
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री सीएम प्रेम कुमार धूमल यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हमीरपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार आशिष शर्मा यांचा विजय झाला आहे.
#WATCH | Congress party workers celebrate in Shimla after Congress crosses the majority mark of 35 seats in Himachal Pradesh amid the ongoing counting of the votes in the state.#HimachalPradeshElections pic.twitter.com/1TklhepVnU
— ANI (@ANI) December 8, 2022
-
गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.
-
गुजरात : आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या इशुदान गढवींचा पराभव
Gujarat CM will take oath at 2pm on 12th December. PM Modi and Union Home Minister Amit Shah will take part in the oath ceremony: State BJP Chief CR Patil pic.twitter.com/xEaCv7GaUo
— ANI (@ANI) December 8, 2022
-
हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहाव्यांदा सिराज मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर या मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत.
-
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री सीएम प्रेम कुमार धूमल यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हमीरपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार आशिष शर्मा यांचा विजय झाला आहे. आशिष शर्मा यांचा 13 हजार 051 मतांनी विजय मिळवला आहे.
-
हिमाचल प्रदेश सरकारचे आठ मंत्री आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री जयराम ठाकूर सिराज मतदारसंघातून विजयी झाले आहेत. काँग्रेसला ४३.३ टक्के आणि भाजपला ४३.४ टक्के मते मिळाली. इतरांना१०.६ टक्के मते मिळाली.
-
हिमाचल प्रदेशात आमदार जयराम ठाकूर यांच्या घरी भाजपची महत्त्वाची बैठक, विनोद तावडे दिल्लीवरून शिमल्यात दाखल
-
हिमाचलप्रदेश निवडणूक | काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर तर भाजप २७ जागांवर आघाडीवर असून १ मिळवली आहे.
-
गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असून ते मिठाई वाटून, ढोल-ताशा लावून विजय साजरा करत आहेत. त्याच पार्श्भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोणार असून तेथे कोअर कमिटीसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर जनतेला संबोधित करणार आहेत
महत्वाच्या लढती
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया मतदारसंघातून, भाजप नेते हार्दिक पटेल विरमगाममधून, अल्पेश ठाकोर दक्षिण गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडून वडगाम जागेवर जिग्नेश मेवाणी, जैतपूरमधून विरोधी पक्षनेते सुखराम राठवा. वाघोडिया मतदारसंघातून भाजपचे बंडखोर नेते मधु श्रीवास्तव अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पोटनिवडणुकीचे निकाल
हिमाचल प्रदेश आणि गुजरात व्यतिरिक्त यूपीच्या मैनपुरी लोकसभा जागा आणि 5 राज्यांतील 6 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही आज येत आहेत. मतमोजणीही सुरू झाली आहे. सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर मैनपुरी ही जागा रिक्त झाली होती. याशिवाय ज्या विधानसभा जागांचे निकाल येतील त्यामध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर आणि खतौली जागा, ओडिशातील पद्मपूर जागा, राजस्थानमधील सरदारशहर जागा, बिहारमधील कुधनी आणि छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर जागा यांचा समावेश आहे. सपा नेते आझम खान यांचे सदस्यत्व रद्द केल्याने रामपूरची जागा रिक्त झाली आहे.
महत्वाचे निकाल…
- मैनपुरी पोटनिवडणुकीत सपा उमेदवार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार रघुराज शाक्य हे मागे पडले आहेत.
- विरमगाम मतदारसंघातून हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीनंतर त्यांना आतापर्यंत 2961 मते मिळाली आहेत. दुसरीकडे या जागेवरून आपचे उमेदवार अमरसिंह ३१३९ मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवाराला ९९६ मते मिळाली आहेत.
- गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला ट्रेंडमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. खंभलिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री चेहरा इशुदान गढवी पिछाडीवर आहेत.
https://www.facebook.com/dailymahanayak/videos/2018659371656881/
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055