IndiaNewsUpdate : अदानी बंदर प्रकल्पाविरुद्ध आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर हल्ला…
नवी दिल्ली : केरळच्या विझिंजम भागात रविवारी रात्री अदानी बंदर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक चकमकीप्रकरणी ३,००० हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दंगल आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये पोलिसांनी महिला आणि मुलांविरुद्ध स्टेशनची तोडफोड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या हिंसाचारात ४० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अनेक स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी सांगितले की, शनिवारी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपी लिओ स्टॅनली, मुथप्पन, पुष्पराज आणि शँकी आणि इतर संशयितांची सुटका करण्याच्या मागणीसाठी सुमारे ३००० लोक विझिंजम पोलिस स्टेशनमध्ये जमले होते.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “लोखंडी रॉड, काठ्या, दगड आणि विटा घेऊन जमाव सायंकाळी ६ वाजता पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिस स्टेशनच्या आत पोलिसांना ओलिस घेतले. आरोपींना सोडले नाही तर पोलिस स्टेशन पेटवून देण्याची धमकी दिली. “पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले आणि पोलिस स्टेशनमधील कार्यालयीन उपकरणे नष्ट झाली. हल्ल्यामुळे सुमारे ₹ ८५ लाखांचे नुकसान झाले”.
आयपीसी कलम १४३ (बेकायदेशीर सभा), १४७ (दंगल), १२०-बी (गुन्हेगारी कट), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी) आणि २५३ (लोकसेवकावर हल्ला) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम शहर पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस ठाण्यावरील हल्ला अजिबात समर्थनीय ठरू शकत नाही. आयुक्त म्हणाले, “आम्ही पुरेसा पोलीस कर्मचारी आधीच तैनात केला होता.