Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी…

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी व्हायला तयार नाहीत . एकीकडे त्यांनी अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी  ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली पण  त्यांचा राजीनामा मुंबई महापालिका मंजूर करायला तयार नाही. तर दुसरीकडे त्यांना देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या राजीनामा याप्रकरणी ऋतुजा लटके मुंबई हायकोर्टातही गेल्या आहेत. 


दरम्यान ऋतुजा लटके यांच्या निवडणूक अर्जाबाबत अडचण आल्यास पक्षाकडून प्रमोद सावंत , विभाग संघटक कमलेश राय किंवा , मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. प्रमोद सावंत हे अंधेरी पूर्वचे विधानसभा संघटक तसेच अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात.  यापूर्वी विश्वनाथ महाडेश्वर  यांनी २०१९ च्या विधानसभा लढवली होती परंतु त्यांना पराभावाला सामोरे जावे लागले होते.

ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अंधेरीमध्ये शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून कोण उमेदवार असेल याचा फैसला मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल.

भाजपकडून मुरजी पटेल यांची उमेदवारी

भाजप आणि शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या सेनेकडून अंधेरी पोटनिवाडणुकीसाठी उद्या उद्या सकाळी ११ वाजता मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे वृत्त आहे. आज या विषयी एक बैठक बोलावण्यात आली होती. दादरच्या वसंत स्मृतीमधील मुंबई भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला मुरजी पटेल देखील उपस्थित होते. दरम्यान भाजपने उमेदवारी नाही दिली तरी मुरजी पटेल ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे.

अनिल परब यांचे आरोप…

याविषयी आज अनिल परब आणि खा. अरविंद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत आज आपली बाजू मांडून  ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात आला. ते  म्हणाले की, “ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही स्वीकारला जात नाही. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय वॉर्ड ऑफिसरपर्यंत सुटायला हवा होता. या विषयात महापालिका आयुक्तांचा तसा काही संबंध येत नाही. पण प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं दिसून येतंय. ऋतुजा लटके या जर शिंदे गटात असत्या तर याचे  चित्र वेगळे  असते.”

दोनच दिवसांपूर्वी ऋतुजा लटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे लटकेंना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली.  पण अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. पण ठाकरे गटाने मात्र लटकेंना शिंदे गटात खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे ३० दिवस म्हणजे ३ नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. ऋतुजा लटके यांना राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं काय होणार याची चर्चा सुरू आहे.

राजीनामा मंजुरीची प्रक्रिया ३० दिवसांची …

दरम्यान आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसून आपण नियमाप्रमाणे काम करत असल्याचे  महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.  ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या ३० दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे  स्पष्टीकरण चहल यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत केवळ दोन दिवस उरली असताना आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अजूनही संदिग्धता कायम आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!