Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : काँग्रेसचे दोन्हीही उमेदवार खंबीर , त्यांना रिमोट कंट्रोलची गरज नाही : राहुल गांधी

Spread the love

तुरुवकेरे (कर्नाटक) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या पुढील अध्यक्षांवर गांधी कुटुंबीयांचा रिमोट कंट्रोल चालणार नाही कारण अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन्ही उमेदवार खंबीर आणि चांगले बोलणारे आहेत.


‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, या यात्रेत आपण एकटे नसून लाखो लोक यात सहभागी आहेत कारण ते बेरोजगारी, महागाई आणि विषमतेला कंटाळले आहेत.

काही लोकांचे म्हणणे आहे की, गांधी घराणे अध्यक्षपदावर नसले तरी पुढच्या काँग्रेस अध्यक्षांवर रिमोट कंट्रोल करू शकतात. याबद्दल गांधींना विचारले असता ते म्हणाले, “निवडणुकीत उतरलेल्या दोघांकडेही एक दर्जा, दृष्टी आहे आणि ते कणखर आणि समजूतदार लोक आहेत. त्यांच्यापैकी कोणीही रिमोट कंट्रोलवर चालणार आहे असे मला वाटत नाही. अर्थात त्यांचा अवमान करण्याचा यामागे कोणताही हेतू नाही.

गांधींनी असेही सांगितले की त्यांचा स्वभाव ‘तपस्या’वर विश्वास आहे आणि ‘भारत जोडो यात्रे’द्वारे लोकांपर्यंत पोहोचून त्यांची वेदना सांगायची आहे. ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असे ३,५०० किमीचे अंतर कापायचे आहे.

राहुल गांधी म्हणाले की द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे आणि  यात  सहभागी असलेल्या प्रत्येकाशी आम्ही लढू”. “आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करत आहोत कारण ते आमचा इतिहास, परंपरा विकृत करत आहे. आम्हाला विकेंद्रित शिक्षण व्यवस्था हवी आहे.”

काँग्रेस नेत्याने सांगितले की ‘भारत जोडो यात्रा’ २०२४ च्या निवडणुकीसाठी नाही तर भाजप आणि आरएसएस देशाचे जे विभाजन करीत आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसला लोकांना एकत्र करायचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!