Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalUpdate : बिहारचे महाभारत : सत्तांतरानंतरचे कवित्व , उपराष्ट्रपती केले नाही म्हणून नाराजी : सुशीलकुमार मोदी

Spread the love

नवी दिल्ली : बिहारमधील एनडीए आघाडीतील तुटण्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितले की, अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी नितीश कुमारांना फोन केला होता. मात्र त्यादरम्यान नितीश कुमार म्हणाले होते की, काळजी करण्यासारखे काही नाही. या भाजप नेत्याने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या दीड वर्षांत नितीश यांच्याशी अनेकदा बोलले, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही.


दरम्यान यापूर्वी सुशील मोदी यांनी जेडीयूचे अनेक नेते भाजपमध्ये आल्याचा दावा केला होता. ते म्हणाले की, तुम्ही नितीशकुमारांना उपराष्ट्रपती बनवा आणि तुम्ही बिहारमध्ये राज्य करा. पण भाजपने तसे केले नाही, कारण भाजपचा स्वतःचा उमेदवार आहे. यामुळे नितीश कुमार यांनी भाजपचा विश्वासघात केला आहे.

नितीश यांना मोदींच्या नावावर मते मिळाली होती…

बुधवारी एनडीटीव्हीशी बोलताना ते पुढे  म्हणाले की, भाजपने नितीश यांना पाच वेळा मुख्यमंत्री बनवले, नितीश आणि भाजपचे १७ वर्षांचे नाते होते, जे नितीश यांनी तोडले. २०२० मध्ये नितीश यांना नरेंद्र मोदींच्या नावाने मते मिळाली होती, नितीश कुमारांच्या नावावर नाही. ते म्हणाले की, तेजस्वी यादव जामिनावर बाहेर आहे. नितीश यांचे हे पाऊल ३० टक्के मागासलेल्यांचा अपमान आहे. नितीश कुमार कधीही तेजस्वी यादव यांचा विश्वासघात करू शकतात, असे सुशील मोदी म्हणाले. ते म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्यावर आरोपपत्र दाखल आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!