DharBusAccidentNewsUpdate : धार बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पीएम , मध्यप्रदेश सह राज्य सरकारकडून अर्थसहाय्य …

मुंबई : मध्ये प्रदेशमध्ये धार येथे महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यानंतर त्यांनी अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश एसटी महामंडळाला दिले आहेत. याशिवाय पंतप्रधान निधीतून २ लाख तर मध्य प्रदेश सरकारकडून प्रत्येकी ४ लाखाची मदत घोषित करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
The bus tragedy in Dhar, Madhya Pradesh is saddening. My thoughts are with those who have lost their loved ones. Rescue work is underway and local authorities are providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान मध्य प्रदेश सरकारच्या वतीनेही मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती मध्य प्रदेशाचे परिवहन मंत्री गोविंदसिंह यांनी दिली आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
मैं सुबह से लगातार अधिकारियों के साथ संपर्क में हूं। मुआवजे के तौर पर 4-4 लाख रुपए मृतकों के परिवार को दिए जाएंगे। दुर्घटना की जांच के आदेश दे दिए गए हैं। जांच में जो भी तथ्य सामने आएंगे उनपर कार्रवाई की जाएगीः मध्य प्रदेश परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत, भोपाल#DharBusAccident pic.twitter.com/Ghrd9pdSGJ
— ANI_HindiNews (@AHindinews) July 18, 2022
१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 असे हे क्रमांक आहेत.
ओळख पटलेल्या मृतांची नावे….
1. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान
3. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर
4. निंबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर
5. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर
6. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला.
7. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर