Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : पहा राज्यातील टॉप १०० मध्ये स्थान मिळवलेल्या शैक्षणि संस्था …

Spread the love

नवी दिल्ली  : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या  नेशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) मध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती. मात्र यंदा संस्थेच्या गुणांकात भर पडली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून 25 व्या स्थानी गेले असून  विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने 45 वे स्थान मिळवले आहे. राज्यातील एकूण 12 शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून हे रँकिंग जाहीर केले जाते.

दरम्यान ओव्हर ऑल रँकिंगमध्ये 1)मुंबई आयआयटी – तिसरे स्थान (82.35), 2)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 25 वे स्थान (56.99), 3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने 26 वे स्थान (56.91), 4) मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने 28 वे (56.16) स्थान पटकावले आहे. 5) मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने 33 वे(54.84) स्थान पटकावले आहे

राज्यातील १२ शैक्षणिक संस्था पहिल्या १०० मध्ये …

NIRF रँकिंगमध्ये मुंबई आयआयटी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाची सुद्धा मागील वर्षीच्या 71 व्या स्थानावरून 45 व्या स्थानावर झेप, तर पुणे विद्यापीठ 12 व्या स्थानी, एका स्थानाने घसरण*

यामध्ये सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अकराव्या क्रमांकवरून बाराव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यापीठांच्या यादीत 71 व्या स्थाना वरून थेट 45 व्या स्थानावर झेप घेतलीये. देशात या NIRF रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या चेन्नईच्या संस्थेने बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने द्वितीय स्थान कायम ठेवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!