Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : स्वतंत्र होण्यावर एकनाथ शिंदे यांनी केला हा खुलासा ..

Spread the love

गोवा : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईला कूच करण्यापूर्वी मध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जे काही झाले त्याचा आम्हाला नक्कीच आनंदनही परंतु परिस्थितीच अशी उद्धवली की , आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी गोव्याहून मुंबईच्या दिशेने प्रयाण केले.


एकनाथ शिंदे गोवा विमातळवर आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की , उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या  मनात कालही आदर होता आणि आजही आदर आहे. उद्धव ठाकरे यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. हे सर्व सुरु असताना आम्हालाही आनंद वाटत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच सर्व आमदारांनी गटनेता म्हणून मला सर्व अधिकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. मी मुंबईत गेल्यानंतर राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन. त्यानंतर आम्ही पुढची रणनीती निश्चित करु, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांचे ट्विट

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी  आज सकाळीच  ट्विट करुन आगामी वाटचालीसंदर्भात भाष्य केले आहे . यामध्ये त्यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाटाघाटी सुरू झाल्या..

दरम्यान शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आ. दिपक केसरकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस शपथविधीची तारीख ठरवणार आहेत. त्यांना  ती तारीख देणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. आमच्या वाटाघाटी सुरू झाल्या असून आम्ही सरकार स्थापन करू.

त्यांनी पुढे म्हटले आहे की , आम्ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही… उद्धवजींनी महाविकास आघाडी सोबतची युती तोडली तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत. आम्हाला आजही त्यांच्याविषयी आदर आहे.  ठाकरेंविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नाही.

एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत. जो काही निर्णय होईल, तो राज्याच्या विकासासाठीच होईल…आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही, संजय राऊत यांनी दिलेली अशी विधाने लोकांमध्ये नाराजी पसरवण्यासाठी आहेत.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांना  काढून टाकणे हा आमचा हेतू नव्हता म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारच्या उत्सवात सहभागी झालो नाही. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आणि उद्धव ठाकरेंना दुखावण्याचा आणि त्यांचा अनादर करण्याचा आमचा हेतू नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!