Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : नेतृत्व चुकीच्या हातात गेले   की देशाचे  वाटोळे  होते : शरद पवार

Spread the love

पुणे  : “नेतृत्व चुकीच्या हातात गेले   की देशाचे  वाटोळे  होते. स्वांतंत्र्याच्या लढ्यात अब्दुल कलाम, आझाद सुद्धा होते. इंग्रजांना सुद्धा देश सोडून जावे लागले होते. कुणी देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवत असेल तर तुम्हाला-मला एक व्हावे  लागेल. काय वाटेल ती किंमत देऊ पण देशाची एकी संकटात जाऊ देणार नाही”, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी  केली आहे.


धर्म आणि हिंदुत्वाच्या नावाखाली देशात घडत असलेल्या घटना आणि सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला एकात्मता आणि एकजुटीने राहण्याचे  आवाहन केले आहे.

पवार यांनी पुढे म्हटले आहे कि , “या देशात विविधतेत सौंदर्य आहे आणि ते सांभाळायचं असेल तर विविध धर्माची फुलं आहेत ती सांभाळायला हवी. जगात, देशात काहीही  परिस्थिती असो आम्ही मात्र आमच्या भागात एकतेचा संदेश देतो. जगात विचित्र परिस्थिती आहे. रशिया युक्रेन सारख्या छोट्या देशावर हल्ला करतोय. मूलं-बाळ मारली जाताहेत. मानवता संपली की काय? असं वाटतंय. दक्षिणेत काय स्थिती आहे? श्रीलंकेत नेतृत्व करणाऱ्यांना लपून बसावं लागतंय. उत्तरेत जो देश आपल्यासोबत स्वतंत्र होतो तिथे काय अवस्था आहे? तरुण मुलगा पंतप्रधान होऊन स्थिती बदलायचा प्रयत्न करतो पण त्याला हटवलं जातं”.

“आम्ही मॅच बघायला कराचीला गेलो होतो. तेव्हा खेळाडू आम्हाला पाकिस्तानचा काही भाग बघायला घेऊन गेले. नाष्टा करायला तिथे खेळाडूंचे पैसे घेतले नाहीत. हे तुम्हाला पटणार नाही. पण सामान्य माणसाचा आपल्याला विरोध नाही. बहुसंख्य समाजाला शांतता हवीय. तिथे गेले की ते त्यांच्या भारतातल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आसुसलेले आहेत”, असेही  पवार म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!