Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कारण – राजकारण : एमआयएमचे नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांच्या औरंगाबाद दौऱ्यात काय झाले ?

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मनसे नेते राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा झाली. दरम्यान  शिवसेनेच्या आणि भाजपच्या सभेच्या आधी औरंगाबादच्या राजकीय समीकरणावर लक्ष असलेल्या एमआयएमनेही पक्षाचे नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांची सभा घेऊन पुन्हा एका चर्चेला तोंड फोडले आहे. “मी कुणालाही उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रात आलेलो नाही. ज्यांना घरातून बाहेर काढले आहे , त्यांच्यावर मी काय बोलू? मी त्यांच्यावर बोलावे , ती त्यांची लायकी नाही , आज या देशात द्वेष पसरवला जात आहे. पण अकबरुद्दीन ओवेसी द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही तर प्रेमाने उत्तर देईन.” अशा शब्दात आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्याच्यावर टीका केली. 

राज ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व संध्येला एमआयएमचे नेते खा . असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये उपस्थित होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्यावर दोन भावांचे भांडण असल्याचे सांगत राज ठाकरे यांच्यावर बोलणे सपशेल टाळले होते. दरम्यान सभेनंतर मात्र त्यांनी सावधपणे राज यांच्यावर टीका केली होती. मात्र आज औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव न घेता आपली तोफ डागली.

https://twitter.com/imAkbarOwaisi/status/1524659017145937920

अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील विविध दर्ग्यांना भेटी देत त्यांनी खुलताबादेतील औरंगजेबच्या कबरीवर फुले अर्पण करीत चादर चढवली. त्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निषेध व्यक्त करीत एमआयएम नेत्यांवर तीव्र शब्दात टीका  केली. 

दरम्यान दिवसभरातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मुस्लिमांचे शिक्षण, रोजगार, अल्पसंख्याकांवरील अत्याचार अशा मुद्द्यांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या केलेल्या घोषणेच्या आणि अल्टिमेटमच्या  पार्श्वभूमीवर ओवेसींनी राज ठाकरे यांचे कुठेही नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी  “हिंदुस्थान जिंदाबाद”च्या मोठ्या आवाजात घोषणा देत “हा देश जेवढा त्यांचा आहे, तेवढा माझा पण आहे, ना ही त्यांची जहागीर आहे, ना माझी आहे, हा देश सगळ्यांचा आहे. आपण सगळे प्रेमाने राहू, सुखाने नांदू, देशाला पुढे घेऊन जाऊ”, अशा भावना व्यक्त करत ओवेसींनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

नेमकं काय म्हणाले आ. अकबरुद्दीन औवेसी ? 

आपल्या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत आ. अकबरुद्दीन औवेसी म्हणाले , “ मी कोणालाही उत्तर द्यायला आलेलो नाही. मी कोणाला वाईट म्हणायला आलेलो नाही, गरजच नाही. तुमची लायकीच नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ. अरे माझा तर एक खासदार आहे, तू तर बेघर आहेस तुला काय उत्तर देऊ. तू तर बेपत्ता आहेस, तुला काय उत्तर देऊ. तूला तर घरातून काढलं होतं तुला मी काय उत्तर देऊ. मात्र, उत्तर देखील नक्की देईन, येईन एकदिवस पुन्हा आमखास मैदानावर. खूप लवकरच येईन. अकबरुद्दीन ओवेसी लढेल आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्या आवडीच्या वेळेवर लढेल. तुमच्या आवडीच्या ठिकाणावर नाही. मी वेळ ठरवणार, जागा मी ठरवणार.”

दरम्यान  उपस्थितांना उद्देशून आ. अकबरुद्दीन म्हणाले की, “तुम्ही घाबरला आहात का? आज या देशात द्वेष पसरवला जात आहे. पण अकबरुद्दीन ओवेसी द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही तर प्रेमाने उत्तर देईन. या सर्व परिस्थितीमुळे तुम्ही घाबरला आहात का? घाबरलं पण नाही पाहिजे. आज जर कोणाला वाटत असेल की तो आम्हाला घाबरवेन आणि आम्ही घाबरू. नाही आम्ही घाबरणार नाही. तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही आहोत. घाबरू नका, निर्धास्त रहा. द्वेष करणाऱ्यांनी ४० टक्के मतं घेतली परंतु ते विसरले की ६० टक्के मत अद्यापही आमच्यासोबतच आहेत. जो भी कुत्ता जैसा भी भोकता है, भौकने दो…, कुत्तौ का काम भौकना है, शेरो काम खामोश चला जाना है. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. ते जाळं विणत आहेत तुम्हाला अडकवण्याठी, तुम्ही अडकू नका जे बोलायचंय बोलू द्या, हसून निघून जा.”

खा. इम्तियाज जलील

या निमित्ताने बोलताना खा. इम्तियाज जलिल म्हणाले कि , औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी चांगल्या बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे स्पर्धा चांगल्या कामांची असायला हवी. औवेसींनी एक शाळा बांधली, शिवसेनेने  दोन शाळा बांधाव्यात, भाजपने सांगावे आम्ही ४ शाळा अशा बांधू. विशेष म्हणजे ज्यांना फक्त अजान ऐकू येते , त्यांनी कमीत कमी एक शाळा उघडण्याच्या बाबतीत बोलावे , असे म्हणत जलील यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना  उपरोधात्मक टोला लगावला. खुलताबाद येथे अनेक दर्गे आहेत. सर्वांचे दर्शन घेत आम्ही तिथे गेलो. यावेळी आम्ही कोणा एकाच्या कबरीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, असे म्हणत औरंगजेबच्या समाधीचे  दर्शन घेतल्याचे  समर्थन केले.

https://twitter.com/imAkbarOwaisi/status/1524690695004450816

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची “औरंगजेब ” दर्शनावरून टीका

आ. ओवेसींनी आपल्या दौऱ्यात खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याचे समजताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी , “ओवेसींनी महाराष्ट्रात येऊन शिवप्रेमींचा अपमान केला. त्यांना औरंगाबादेतील सामाजिक सलोख्याचे  वातावरण बिघडवायचे आहे. आम्ही हे सहन करणार नाही”, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली.

आपली प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले कि , “औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यापाठीमागची संकल्पना समजली नाही. पण मला खूप राग आला, जिथे मुस्लिम बांधवही जात नाहीत, तिथे अकबरुद्दीन ओवेसी यांनी जाण्याचे  कारण काय?, हे मला समजले  नाही. त्यांना ही भेट देऊन, काय मेसेज द्यायचा होता? त्यांच्या या भेटीमुळे  आम्हा शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करुन मारले , त्याच्या कबरीवर डोकं ठेवता? एमआयएमचा खोटा चेहरा आम्ही लोकांसमोर आणू, शिवसेना एमआयएमला चोख प्रत्युत्तर देईल”, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी ओवेसी आणि जलील यांना दिला.

इतकेच नाही तर त्यांनी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनाही थेट फोन लावून ओवेसींच्या औरंगजेब कबरीच्या भेटीचा अर्थ विचारत तीव्र  नाराजी व्यक्त करीत दवाखाना, शाळेबाबत काम करा, आम्ही तुमचे अभिनंदन करु पण शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे  काम करु नका, असेही  त्यांनी वारिस पठाण यांना सुनावले. तर ,  चुकून निवडून आलेला खासदार शहरातील वातावरण दूषित करण्याचे  काम करत आहे, असे म्हणत खैरे यांनी इम्तियाज जलील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

भाजपकडूनही अकबरुद्दीन ओवेसी यांचा निषेध

दरम्यान  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ओवेसींवर टीका करताना म्हणाले कि , औरंगाबाद दौऱ्यात ओवेसींना औरंजेबाच्या कबरीला भेट देऊन आपण औरंजेबाची औलाद असल्याचे  त्यांनी दाखवून  दिले. औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन ओवेसींनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या.  मुस्लिम असले तरी राष्ट्रभक्ती दाखवायला हवी होती. महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा आहे. इथे येऊन त्यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्यांचा मी निषेध करतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!