Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प संस्थे मार्फत 8000 विद्यार्थ्यांची जागृती 

Spread the love

आष्टी : टाईम्स ऑफ इंडिया, विको वज्रदंती व १८८९ पासून कार्यरत राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मौखिक आरोग्य व स्वच्छता या विषयावर 8000 विद्यार्थ्यांची नुकतीच जागृती करण्यात आली.

या शाळांचा सहभाग

टाईम्स ऑफ इंडिया व विको वज्रदंती च्या सीएसआर मार्फत राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प, आष्टी च्या माध्यमातून व पुढाकाराने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, गंगाई फार्मसी कॉलेज इत्यादी महाविद्यालयां मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल, पिंपळेश्वर इंग्लिश मेडीअम स्कूल, मोतीलाल कोठारी विद्यालय, श्री गणेश विद्यालय, राजमाता जिजाऊ प्राथमिक शाळा, श्रीराम विद्यालय, भगिनी निवेदिता कन्या शाळा, द्वारका प्रतिष्ठान इंटरनॅशनल गुरुकुल, पद्मावती विद्यालय डोईठाण, जि. प. प्राथमिक केंद्र शाळा डोईठाण, जि. प. प्राथमिक शाळा कापसी, स्वामी विवेकानंद विद्यालय बावी, जि. प. प्राथमिक शाळा कारखेल, सुदर्शन विद्यालय सांगवी, जि. प. प्राथमिक केंद्र शाळा सांगवी, जि. प. प्राथमिक केंद्र शाळा सुरुडी, जि. प. प्राथमिक शाळा बावी, इंदिरा माध्यमिक व कन्या उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव, जि. प. माध्यमिक शाळा धामणगाव इत्यादी शाळांमधील विद्यार्थी-विद्याथीनी तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील अरणेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अरणगाव, नंदादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नान्नज, गॅलेक्सी इंग्लिश स्कूल हाळगाव, जि. प. प्राथमिक केंद्र शाळा हाळगाव, श्री भैरवनाथ विद्यालय हाळगाव इत्यादी शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळून एकुण 8000 विद्यार्थी- विद्यार्थीनीची मौखिक आरोग्य व स्वच्छता या विषयावर जागृती करण्यात आली.

दरम्यान ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या जागृती कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला त्या सर्व 8000 विद्यार्थी- विद्यार्थिनींना टाईम्स ऑफ इंडिया व विको वज्रदंती यांची प्रमाणपत्रे राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प, आष्टी या संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आली. यापैकी काही कार्यक्रमास टाईम्स ऑफ इंडिया सीएसआर चे महाराष्ट्र राज्य समन्वयक  अनिल जेम्स   यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्याना व शिक्षक वृन्दांना मौलीक मार्गदर्शन केले.

शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप

सर्व रोगांचे प्रवेशद्वार हे प्रत्येकाचे मुख [तोंड] असल्यामुळे मुखाचे आरोग्य, स्वच्छता व निगा चांगली राखली पाहिजे, मुखातूनच सर्व रोगजंतू पोटात जातात त्यामुळे आरोग्य बिघडते आणि प्रसंगी मृत्यूस देखील सामोरे जावे लागले इत्यादी विषयावरील विको वज्रदंती ने तयार केलेली एक चलचित्रफीत सर्व महाविद्यालय व शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. त्यानंतर प्रत्येक शिबिरात त्यावर आधारीत काही महत्वाचे प्रश्न राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी संस्थेचे सचिव अॅड. प्रबोधन निकाळजे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनीना विचारले. विद्यार्थी-विद्यार्थिनीनी हा विषय व्यवस्थित आत्मसात केल्याची खात्री केल्यानंतर प्रत्येक शिबिरात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनीना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

सर्व ठिकाणच्या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांसह सर्व प्राचार्य, प्राध्यापक वृंद व सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी अत्यंत उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसह शिबीर आयोजित करणाऱ्या सर्व शाळांना व महाविद्यालयांना देखील आयोजक सहभागी संस्था म्हणून प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. हरिदास विधाते सर, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संचालक हेमंतसेठ पोखरणा, प्रा. डॉ. शंभू वाघुले, प्रा. डॉ. बापू खैरे, प्रा. संभाजी ओव्हाळ, प्रा. अविनाश भवर, केंद्रप्रमुख आम्रपाली सावंत, केंद्रीय मुख्याध्यापक संजय दहातोंडे तसेच मुख्याध्यापक – सुरेंद्रनाथ चव्हाण सर , वराट सर, मुख्याध्यापक सुनिल शिंदे सर, कुंडलिक लटपटे सर, पठाण आयूब खान सर, गहिनीनाथ तोतरे सर, अशोक उढाणे सर, गीताराम राठोड सर, अशोक लटपटे सर, दादासाहेब गर्जे सर, हिरामण पोकळे सर व सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन केले व अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे आयोजक संस्था

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्य व स्वच्छता यांस महत्व देण्यात आले व जाणीवपूर्वक कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.उद्योग जगताची देखील सामाजिक जबाबदारी व बांधिलकी असते त्यामुळे उद्योग जगताने समाजातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे त्यामुळे टाईम्स ऑफ इंडिया व विको वज्रदंती च्या सीएसआर च्या माध्यमातून राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कर्तव्य व जबाबदारी म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे संस्थेचे सचिव अॅड.प्रबोधन वाल्मीक निकाळजे यांनी सांगितले.

मौखिक आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचे…

दरवर्षी 20 मार्च हा दिन जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आरोग्य सदृढ राखण्यासाठी प्रयत्न होतात परंतु मौखिक तसेच दातांच्या आरोग्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिले जात नाही. मौखिक आरोग्याबाबत नेहमी निष्काळजीपणा केला जातो. त्यामुळे सर्वांगीण आरोग्य सदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचे आहे यावर प्रत्येक ठिकाणच्या शिबिरांमध्ये भर देण्यात आला. सर्व शिबिरे यशस्वी करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक निखील ढेंगे, ऋषिकेश सोळसे, अशोक धस, बाळकृष्ण औटे, सोनटक्के इत्यादींनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!