Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मशिदीवरून होणाऱ्या अजान बाबत अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय

Spread the love

अलाहाबाद : देशभरात आणि खासकरून महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणानंतर लाऊडस्पीकरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान अजान देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून लाऊडस्पीकरवरून अजान देणे हा मूलभूत अधिकार नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या याचिकेत लाऊडस्पीकरवरून अजान देण्याची मागणी करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील बदायूं येथील रहिवासी असलेल्या इरफानने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नूरी मशिदीतून लाऊडस्पीकरवरून अजान देण्याची मागणी केली होती. मात्र ही याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना म्हटले की, अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे, परंतु लाऊडस्पीकरद्वारे अजान देणे इस्लामचा भाग नाही. त्यामुळे न्यायमूर्ती विवेककुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

महाराष्ट्रात आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय

विशेष म्हणजे यूपी-महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवरून वाद सुरू आहेत. यूपीमध्ये योगी सरकारने मंदिर आणि मशिदींमधून मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर हटवले आहेत. याशिवाय अनेक धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात लाऊडस्पीकरबाबत मुस्लिम धर्मगुरूंनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय दिली जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध सुन्नी बडी मस्जिद मदनपुरा आणि मिनारा मशिदीत सकाळी अजान करण्यात आली, जी लाऊडस्पीकरशिवाय करण्यात आली. प्रत्यक्षात बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरूंची बैठक झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल.

सरकारची भूमिका

दरम्यान धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावरून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी करत मनसेने आंदोलन सुरु केले आहे. तर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विना परवानगी मंदिर किंवा मशिदीवर भोंगे बसवू नये, असे अजित पवार यांनी म्हटले आहे .तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर ऐकविण्यात येऊ नये असे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!