Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiBhideNewsUpdate : “क्लीन चिट ” मिळताच भिडे समर्थकांनी ‘विजय दिन’ साजरा करीत केली ही मागणी .. ..

Spread the love

सांगली : न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याच्या आधीच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिल्याचे वृत्त समजताच भिडे समर्थकांनी विजयी दिन साजरा केला आहे. 

दरम्यान या प्रकरणात  मुख्य सूत्रधार, एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कलामंच यांच्यावर कारवाई करावी आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे  नेते प्रकाश आंबेडकर यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे. तसेच मुख्य सूत्रधार असणाऱ्या, कट कारस्थान करणाऱ्या शहरी नक्षलवादाविरोधात राज्यभर मोर्चे काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भिडे समर्थकांनी म्हटले आहे की , भिडे गुरुजींचे नाव वगळले हा प्राथमिक विजय आहे. १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या या दंगलीत संभाजी भिडे यांना सर्वप्रथम उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला होता. कोरेगाव भीमाच्या आडून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. या दंगलीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांनी समस्त हिंदू समाजाला बदनाम करण्याचे  काम केले. माध्यमांसमोर वक्तव्य करून जाती-जातीत तेढ निर्माण केली. त्यानंतर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत दोघांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले.

आता पुणे ग्रामीण पोलिसांनी यात तथ्य नसल्याचा तपास केला आहे. त्यामुळे या दंगलीच्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करावी, तसेच  शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी एक पत्रकार परिषदेत  केली. या कारवाईच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश खांबे, आनंदराव चव्हाण, भूषण गुरव, प्रकाश निकम, अजिंक्य बोलाज, युवराज जाधव उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!