Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांचे निधन

Spread the love

केरळ : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते 90 वर्षांचे होते. केरळ येथील पालघाट येथे शंकरनारायणन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६ राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला होता. आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली.

कटीकल शंकरनारायणन हे मुळचे केरळ येथील पलक्कड जिल्ह्यातील शोरनूर इथं जन्म झाला होता. 1977 मध्ये काँग्रेसकडून ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. १९८५ ते २००१ या १६ वर्षांच्या कालखंडात ते काँग्रेसकडून त्यांनी यूडीएफ संयोजक म्हणून पदभार सांभाळला. शंकरनारायणन हे प्रामाणिकपणा व सचोटीसाठी परिचित असे आदरणीय व लोकप्रीय नेते होते. केरळ विधानसभेचे ते दीर्घ काळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासक होते. केरळचे वित्तमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले होते. महाराष्ट्रातील आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले होते.

दिवंगत शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोकसंवेदना त्यांची कन्या तसेच इतर आप्तेष्टांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!