Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : ” हा तर १२ कोटी मराठी माणसांचा अपमान !!” गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत …

Spread the love

मुंबई  : महाराष्ट्राच्या मुंबईत कार्यक्रम आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्रिकेवर नाव न टाकल्याबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  ‘मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ अशा स्पष्ट शब्दात  टीका टीका केली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना प्रदान करण्यात आला. पण, या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल आणि कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

यावेळी व्यासपीठावर आशा भोसले, मिनाताई खडीकर, आदिनाथ मंगेशकर उपस्थितीत होते. आणि त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना  प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ह्रदयनाथ मंगेशकर गैरहजर होते.

मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  प्रदान करण्यात आला. परंतु  या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत आपले ट्विट केले. ‘मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी’, असल्याची थेट टीका आव्हाड यांनी केली आहे.  ‘या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाकडे आणि मोदींच्या दौऱ्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपशेल पाठ फिरवली असली तरी राज शिष्टचार म्हणून   राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या दौऱ्याच्या प्रसंगी हजेरी लावली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती.

मोदी यांचे सत्काराला उत्तर

पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर मोदींनी आपल्याला  भावना व्यक्त केल्या. आपण हा पुरस्कार देशाच्या जनतेला समर्पित करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी मोदींनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी लतादीदी यांच्यासोबत आपली ओळख कधी झाली याबात माहिती दिली. तसेच त्यानंतर आपले मंगेशकर कुटुंबासोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.”चार-साडे चार दशकांपूर्वी ज्येष्ठ दिवंगत संगीतकार आणि गायक सुधीर फडकेंनी आमचा परिचय केला होता. तेव्हापासून आजपर्यंत मंगेशकर परिवारासोबत अपार स्नेह, अगणित घटना माझ्या आयुष्याचा भाग बनले. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह मोठी बहीण होती. मला त्यांच्याकडून नेहमी मोठ्या बहीणीसारखं अपार प्रेम मिळालं आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यातलं मोठं सौभाग्य काय असू शकतं! आता राखी पौर्णिमेला दीदी राहणार नाहीत. लता दीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. हा पुरस्कार स्वीकारणं माझं दायित्व आहे. मी या पुरस्काराला संपूर्ण देशवासींना समर्पित करतो”, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!