Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : जयश्री पाटील यांना न्यायालयाचा अटकेपासून दिलासा

Spread the love

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनाही सह आरोपी केले असून त्यांच्या अटकेला न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान सध्या त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याविरुद्ध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांना मात्र मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

पोलिसांकडून सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासानुसार सिल्व्हर ओक आणि बारामतीवर हल्ला करण्याआधी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये जयश्री पाटील सहभागी होत्या असा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. आज या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्ते यांच्या पत्नीला दिलासा दिला. जयश्री पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. “सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यासाठी झालेल्या बैठकीत जयश्री पाटील सामील होत्या, असा दावा मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. तसंच, सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यांना सहआरोपी केले होते. पण, आता जयश्री पाटील यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!