Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक ‘ बंगल्यावरील आंदोलनावर बोलले राज्यपाल…

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळातून या घटनेवर प्रतिक्रिया येत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर विश्वास दाखवला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटतं. त्यासाठी आमचं राज्य सरकार लक्ष देईल”, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई : दिलीप वळसेपाटील

दरम्यान आज दिवसभरातील घडामोडींवर  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि ,  “सविस्तर निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझं एवढच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली. त्याप्रमाणे जो काही कायद्यानुसार निर्णय करणे आवश्यक होतं तो केलेला आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.” तसेच, “शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, मुख्यमंत्र्यासोबत हीच चर्चा झाली की, काल जो काही प्रकार घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे. कुठे कमतरता राहिली, त्यावर पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्यामध्ये घेऊ.” असंही वळेस पाटील म्हणाले. याचबरोबर, “कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात ज्या त्रूटी दिसून आलेल्या आहेत. त्या संदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.” अशा शब्दातं गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.

नेता शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतात : शरद पवार

दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याचं नमूद केलं. “आपण या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला आणि त्याचे परिणाम आज इथे दिसत आहेत. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

 पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील : अजित पवार

“माध्यमांना जी गोष्ट आधी कळते, ती गोष्ट मुंबई पोलिसांना का नाही समजू शकली?” असा सवाल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!