Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : कर्तव्यात चूक : ‘सिल्व्हर ओक ‘ प्रकरणी डीसीपीची तडकाफडकी बदली

Spread the love

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ बंगल्यावरील आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुंबई पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या हल्ल्या प्रकरणात ११० जणांना मुंबई पोलिसांना अटक केली आहे. तर आता या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकरणात झोन दोनचे डीसीपी योगेश कुमार यांना तडकाफडकी पदावरुन हटवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

सत्ताधारी आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमतो आणि हल्ला करण्यात येतो हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचे  फेल्युअर असल्याचे  म्हटले  गेलं. ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात मग पोलीस का नाही पोहोचू शकत असाही प्रश्न उपस्थित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!