Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : मायावती राहुल गांधींवर भडकल्या , घर सांभाळता येईना अन आमच्यावर प्रश्नचिन्ह …!!

Spread the love

लखनौ : बसपा प्रमुख मायावती यांच्यावर काल काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर मायावती यांनी राहुल गांधी यांना कडक शब्दात प्रत्यूत्तर दिले आहे.  दलितांच्या उत्थानासाठी बसपने शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु काँग्रेसने त्यांच्या दीर्घ यूपीच्या राजवटीत त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही,  त्यांना त्यांचे विखुरलेले घर सांभाळता येत नाही, पण आमचा पक्ष बसपच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालानंतर बोलताना काल राहुल गांधी यांनी म्हटले होते कि,  मायावती जी यूपीमध्ये निवडणूक लढवत नाहीत. आम्ही त्यांना संदेश दिला, युती करा, मुख्यमंत्री व्हा, अशी चर्चाही केली नाही. मी कांशीरामजींचा आदर करतो. रक्त आणि घामाने त्यांनी उत्तर प्रदेशातील दलित आवाज जागवला. काँग्रेसचे नुकसान झाले, ही वेगळी बाब, पण तो आवाज जागृत झाला हे महत्वाचे आहे. परंतु आज मायावती जी म्हणतात की मी त्या आवाजासाठी लढणार नाही.

या विधानाला उत्तर देताना मायावती म्हणाल्या की, राहुल गांधी हे खोटे आरोप करत असतात की बसपा सुप्रिमोची भूमिका भाजपला  पूरक आहे, कारण मला ईडी वगैरेची भीती वाटते. मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली हे त्यांचे विधान पूर्णपणे निराधार आहे. विरोधी पक्षांवर भाष्य करण्यापूर्वी काँग्रेसने शंभर वेळा विचार करावा.

त्यांनी स्वत:चा पक्ष कसा विस्कटला, याची काळजी करायला हवी…

मायावती म्हणाल्या की, काँग्रेसला भाजप-आरएसएसच्या विरोधात कुठेही पूर्ण ताकदीनिशी लढता आलेले नाही, तर हे लोक काँग्रेस आणि विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चायना टाईप वन पार्टी सिस्टम लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देशात संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.  मी सत्तेत असतानाही राहुलजींनी मोर्चे आणि धरणे करून माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण इतर पक्षांच्या सरकारमध्ये त्यांनी कधीही तसे केले नाही. इतर पक्षांबद्दल बोलण्याआधी त्यांनी स्वत:चा पक्ष कसा विस्कटला, याची काळजी करायला हवी.

मायावती म्हणाल्या, “काँग्रेस स्वतःच्या पक्षात सुधारणा करू शकत नाही. स्वतःचे घर व्यवस्थित करू शकत नाही, परंतु आमच्या प्रकरणांमध्ये घुसखोरी करत आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी बसपवर टिप्पणी करण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे.”  “आमचा पक्ष असा नाही कि , ज्या पक्षात राहुल गांधींसारखा नेता संसदेत पंतप्रधानांना जबरदस्तीने मिठी मारतो,  ज्याची  जगभर थट्टा केली जाते.”

विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, मायावतींच्या बसपा पक्षाला फक्त एक जागा जिंकता आली तर  काँग्रेसला — प्रियंका गांधी वाड्रा प्रचारात आघाडीवर असूनही युपीसारख्या महत्वाच्या राज्यात ४०३ पैकी फक्त दोन जागा मिळाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!